Shivajinagar Court : “वारंवार नादुरूस्त होणाऱ्या नवीन इमारतीतील लिफ्टची कायमस्वरूपी उपाययोजना करा”; ॲड. बाळासाहेब खोपडे यांची मागणी
विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे माझ्यासह इतर व्यक्तीही लिफ्टमध्ये आडकल्या होत्या. सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांच्या मदतीने आम्हा सर्वांची सुटका झाली.

Shivajinagar Court : शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीतील तीनही लिफ्ट वारंवार नादुरूस्त होत आहेत. यामध्ये वकील, पक्षकार अडकण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती जीव मुठीत घेऊन लिफ्टमधून जातात. त्यातच बचाव व्यवस्था व अटेंडंटचा अभाव आहे.
या पार्श्वभूमीवर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी माजी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आणि महाराष्ट्र स्टेट पल्बिक प्रॉसिक्युटर्स असोसिएशन नागपूरचे माजी महासचिव ॲड. बाळासाहेब खोपडे यांंनी पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश अंजू शेंडे यांच्याकडे केली आहे.
नवीन इमारतीत ४० हून अधिक न्यायालये आहेत. येथे सरकारी वकील कार्यालये, विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय, बेलिफ कार्यालयही आहे. त्यामुळे दररोज ५ हजारहून अधिकांची ये-जा असते. यामध्ये नागरिक, पोलीस आणि वकिलांचा समावेश आहे.
या सर्वांसाठी तीन लिफ्ट आहेत. या लिफ्ट वारंवार नादुरूस्त होता. वीज गेल्यास बॅकअप नाही. त्यामुळे अशा घटना घडल्यास लिफ्टमधील व्यक्ती आतमध्ये आडकतात. ८ अॉक्टोबर रोजी माझ्याबाबतही असा एक प्रसंग घडला.
विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे माझ्यासह इतर व्यक्तीही लिफ्टमध्ये आडकल्या होत्या. सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांच्या मदतीने आम्हा सर्वांची सुटका झाली. न्यायालयात सामान्य व अन्यायग्रस्त नागरिक न्याय मिळविण्यासाठी येत असतात. याचा गांभीर्याने विचार करून लिफ्टबाबत उपाययोजना कराव्यात.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लिफ्टच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या न्यायालयीन प्रशासनातील अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि तांत्रिक देखभाल योजना यांच्यामध्ये समन्वय साधून लिफ्टची सुरक्षितता, देखभाल आणि सार्वजनिक प्रवेशयोग्यता यांचे परीक्षण करून कायसस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी ॲड. खोपडे यांनी केली आहे.
– खोपडे यांचा फोटो आहे. वापरावा






