imp news | उद्या पिंपरी एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद
Updated On:

पिंपरी – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरूस्तीसाठी विद्युत व यांत्रिकी विभागामार्फत गुरूवारी (दि. 12) सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, शुक्रवारी होणारा पाणीपुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. एमआयडीसीमार्फत पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सी.एम.ई., आर ऍण्ड डी (दिघी),
व्ही.एस.एन.एल., कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओ.एफ.डी.आर. या भागात ज्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्यांनी आवश्यक तो पाण्याचा साठा अगोदर करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसी कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.





