पंतप्रधानांच्या भेटीनंतर लगेच ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

ग्वाल्हेर – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत आई माधवी राजे, पत्नी प्रियदर्शनी आणि मुलगा आर्यमन सुद्धा उपस्थित होते. या भेटीचे काही फोटो ज्योतिरादित्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर लगेच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, आता पंतप्रधान मोदींच्या या खास भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महाआर्यमन यांच्याकडे ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा पदभार देण्यात आला आहे.
यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी से सपरिवार सौजन्य भेंट की। @narendramodi pic.twitter.com/JUc9EUvMcz
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 30, 2022
नुकतंच ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी माजी आयएएस प्रशांत मेहता यांची नियुक्ती करण्यात आली.
तर उपाध्यक्षपदी महाआर्यमन शिंदे यांची निवड करण्यात आली. नव्या पिढीचा विचार लक्षात घेऊन महाआर्यमन यांना संधी देण्यात आली. त्यामुळे आता येणाऱ्या काळात महाआर्यमन शिंदे ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पडतील.
दरम्यान, येत्या विधानसभेच्या रिंगणात अनेक नेत्यांनी त्यांची पुढची पीढी राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. तर, एकीकडे महाआर्यमन शिंदे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.





