Rain Alert : अवकाळी पावसाचा इशारा! महाराष्ट्रासह २१ राज्यांना अलर्ट; ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता
Rain Alert : मान्सूनचा हंगाम संपला असला, तरी पावसाचे संकट अद्याप कायम आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील २१ राज्यांसाठी पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Rain Alert : मान्सूनचा हंगाम संपला असला, तरी पावसाचे संकट अद्याप कायम आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील २१ राज्यांसाठी पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे. (Rain Alert)
२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, ओडिशा आणि इतर राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Rain Alert)
उत्तर भारतात तापमानात घट होण्याची शक्यता
या हवामान बदलाचा परिणाम उत्तर आणि पूर्व भारतातील अनेक भागांवर होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमानात ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ शकते. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका असून, जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. (Rain Alert)
आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागांत गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Rain Alert)
महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?
महाराष्ट्राबाबत हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र राहू शकते, तर काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा आणि मेघगर्जनेचा अंदाज आहे. (Rain Alert)
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील काही दिवस हवामान प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा नसल्याचे दिलेल्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. (Rain Alert)
शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. (Rain Alert)
Rain Alert : महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा




