Cyclone News : बंगालच्या उपसागरात नवे चक्रीवादळ घोंघावणार; ‘या’ ३ राज्यांत अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट
Cyclone News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील २४ तासांत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

Cyclone News : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालच्या उपसागरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, १ नोव्हेंबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. (Cyclone News)
यामुळे २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी (यनम) आणि ओडिशा या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि पुद्दुचेरीच्या यनम भागात २ आणि ३ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो. (Cyclone News)
तर ओडिशासाठी ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाचा रेड/ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याआधी २८ ऑक्टोबरच्या सकाळी अर्णव चक्रीवादळ बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकले होते. (Cyclone News)
सुमारे १३० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेकडो झाडे उमळून पडली, घरे पाण्याखाली गेली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात बेपत्ता झालेल्या १२ लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. (Cyclone News)
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील ६ तासांत तीव्र अवदाबात आणि पुढील २४ तासांत चक्रीवादळात बदलेल. ही प्रणाली पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकत २ नोव्हेंबर २०२६ च्या संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा अंदाज आहे. (Cyclone News)
Cyclone News : ‘ही’ आहेत पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात भीषण चक्रीवादळे; वाचा रंजक इतिहास !





