Father Dies: ‘५१०० पाठवते, अंत्यसंस्कार उरकून घ्या’, भेटीची ओढ लावून बसलेल्या बापाच्या अंतिम दर्शनालाही लेकींना वेळ मिळेना
Father Dies: समाजातील बदलती मानसिकता आणि नात्यांमधील हरवत चाललेली जिव्हाळ्याची वीण मनं सुन्न करणारी आहे.

Father Dies: आपल्या लेकींना शिक्षण देऊन मोठे करुन त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी बाप नावाचा माणूस आयुष्यभर स्वत:ला कष्टात झोकून देतो. त्यासाठी त्याला होणाऱ्या त्रासाची तो कधीच परवा करत नाही. पण ह्याच लेकी जेव्हा मोठ्या होतात आणि काम करू लागतात, तेव्हा त्यांना वडिलांचा पूर्णपणे विसर पडतो का? असा सवाल आता एका घटनेमुळे उपस्थित केला जात आहे. (Father Dies)
हे सांगण्यामागचं कारण म्हणजे हरियाणामधील सोनीपतमधील घडलेली घटना… एका बापाचा वृद्धाश्रमातच अंत झाला. पण लेकींना अखेरचं पाहावं आणि जीव सोडावा, अशी त्या वडिलांची इच्छा होती. हीच एक आस उराशी बाळगून त्यांनी जगाचा निरोप घेतला. ज्या तीन मुलींना लहानाचे मोठे करून कर्तबगार बनवले, त्यांपैकी एकही मुलगी बापाला भेटण्यासाठीच काय तर बापाच्या अंतिम दर्शनासाठी देखील आली नाही. जन्मदात्या पित्याचं अखेरचं दर्शन घेण्यासही त्यांच्याकडे वेळ नव्हता.
नेमकं काय आहे प्रकरण? (Father Dies)
मुंबईमध्ये कापड व्यापारी असलेल्या शिवचरण रतन गुप्ता यांना व्यवसायात नुकसान झाल्यानंतर सोनीपतला गेले. पत्नीच्या निधनानंतर दीड वर्षापूर्वी ते सोनीपत येथील वृद्धाश्रमात राहण्यास आले होते. त्यांना मुलगा नव्हता, तीनही मुली होत्या. लेकींसाठी त्यांनी सगळं केलं. त्या शिकून यशस्वी झाल्या.
मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. ते रोज आपल्या मुलींच्या फोनची वाट पाहायचे. वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना त्यांच्या वडिलांच्या गंभीर आजारपणाची माहिती दिली होती. मात्र, कामाचे आणि वेळेचे कारण सांगत मुलींनी येण्याचे टाळले.
५१०० रुपये पाठवतोय, अंत्यसंस्कार करून घ्या…. ( Father Dies)
अखेर आजाराशी झुंज देत वडिलांनी वृद्धाश्रमातच अखेरचा श्वास घेतला. वृद्धाश्रम प्रशासनाकडून गुप्ता यांच्या निधनाची माहिती तिन्ही लेकींना देण्यात आली. तसेच तुम्ही येत असाल तर आम्ही पार्थिव ठेवून देतो. परंतु, तरीही मुलींनी येण्यास स्पष्ट असमर्थता दर्शवली. त्यांच्या अंत्यसंस्काराला एकही मुलगी पोहोचली नाही.
५१०० रुपये पाठवतोय, अंत्यसंस्कार करून घ्या, अशा सूचना त्यांनी वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांना दिल्या. वडिलांचे अंत्यविधी त्यांनी व्हिडीओ कॉलवरुन पाहिले. इतकेच काय तर जन्मदात्याच्या अस्थी घेण्यासही त्या आल्या नाहीत. वेळ नसल्याचे सांगून वृद्धाश्रमाच्या संचालकांनाच त्या गंगेत विसर्जित करण्याची विनंती त्यांनी केली. तसेच मुलींनी अंत्यसंस्काराचे सगळे व्हिडीओ पाठवण्यास सांगितलं.
दोन लेकी शिक्षिका (Father Dies)
गुप्ता यांची थोरली कन्या अनिता नेपाळला राहते असून त्या तिथे शिक्षिका आहे. गुप्ता यांची यांची दुसरी लेक निशा उत्तर प्रदेशच्या आजमगढमध्ये वास्तव्यास आहे. तर धाकटी कन्या प्रिया मुंबईला राहते. गुप्ता यांनी त्यांच्या तिन्ही लेकींना उत्तम शिक्षण दिलं. आज त्या आयुष्यात यशस्वी आहेत. पण वडिलांच्या अंत्यविधीसाठी त्यांना वेळ नाही.
दरम्यान, जे आई-वडील मुलांना वाढवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवतात, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठीही कोणी येऊ नये, मुले आपल्या जन्मदात्यांप्रती इतकी निष्ठुर कशी असू शकतात? असा सवाल आश्रमातील व्यक्तींनी उपस्थित केला आहे. (Father Dies)
समाजातील ही बदलती मानसिकता आणि नात्यांमधील हरवत चाललेली जिव्हाळ्याची वीण पाहून मनं सुन्न होते. ही घटना म्हणजे केवळ फक्त एका बापाचा अंत नाही, तर माणसांमधील ‘माणुसकी’ आणि ‘नात्यांचा’ झालेला दुर्दैवी अंत आहे.
हेही वाचा:





