पाचगणीत धनदांडग्यांचे अवैध उत्खनन; वणवा लावण्याचा उद्योग

Updated On:

पाचगणी (प्रतिनिधी) – पाचगणी नगरपालिका हद्दीमधील संजीवन नाक्‍याजवळील प्लॉट नं. 533 मध्ये प्राजक्ता हसबनीस यांनी 2019 मध्ये बेकायदा उत्खनन केले असताना, आता पुन्हा निसर्गाची दुर्दशा करत वणवे लावण्याचे उद्योग धनदांडग्यांकडून सुरू आहे; परंतु महसूल व वन विभाग फक्त पंचनामे करून हात वर करत आहेत. हे सर्व प्रकार बिनधास्त सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाचगणी नगरपालिकेच्या हद्दीतील तायघाट, संजीवन नाक्‍याशेजारील प्लॉट नं. 533 मध्ये 2019 मध्ये मशिनरीच्या साहाय्याने डोंगर पोखरण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी महसूल विभागाकडून पंचनामा करून प्रकरण दडपण्यात आले होते.

हा प्लॉट प्राजक्ता हसबनीस यांच्या मालकीचा आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल न झाल्याने संबंधितांचे फावले आहे. आता पुन्हा या प्लॉटमध्ये वणवा लावून वनसंपदेची हानी करण्याचा उद्योग सुरू आहे. पाचगणीत धनदांडगे महसूल व वन विभागाला “मॅनेज’ करून निसर्गाचे लचके तोडत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत.

अवैध उत्खननप्रकरणी पंचनामा केल्यानंतर महसूल विभागाकडून ठोस कारवाई न झाल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्लॉट नं. 533 मधील प्रकारांबाबत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Satara News : उंब्रजच्या निसर्गोपचारतज्ञ नीलम देशमुख यांचा निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने गौरव

2026-10-08 22:44:56

Satara News : उंब्रजच्या निसर्गोपचारतज्ञ नीलम देशमुख यांचा निसर्गोपचार गौरव सन्मान पुरस्काराने गौरव

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत