Wimbledon Open 2024 : इगा स्विटेकची आगेकूच, सोफिआ केनिनला केलं पराभूत…

Wimbledon Tennis Tournament 2024 (Iga Świątek vs Sofia Kenin) – प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अग्रमानांकीत इगा श्वेटेकने आपली आगेकूच कायम राखली आहे. पोलंडच्या इगा स्विटेकनेही अमेरिकेच्या सोफिआ केनिनला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.
अमेरिकेची दुसऱ्या मानांकित कोको गॉफने देखील स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. यासह महिला एकेरीत ओन्स जाबेउरने पुढची फेरी गाठली. पुरुष एकेरीत स्टेफानोस त्सित्सिपास, कार्लोस अल्कराझ, मेदवेदेवने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
महिला एकेरीत गॉफने आपल्या दुसऱ्या सामन्यात रोमानियाच्या एन्का टोडोनीला ६-२, ६-१ अशा फरकाने पराभूत केले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गॉफने टोडोनीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. तर, ट्युनिशियाच्या जाबेउरने जपानच्या मोयुका उचिजिमावर ६-३, ६-१ अशा फरकाने विजय नोंदवला.
Wimbledon Open 2024 : नागलने दुहेरीतही केली निराशा, पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…
पुरुष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या तिसऱ्या मानांकित कार्लोस अल्कराझने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सांदर वुकिचला ७-६ (७-५), ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवले. तर, डॅनिल मेदवेदेवने फ्रान्सच्या अॅलेक्झाडर म्युलेरवर ६-७ (३-७), ७-६ (७-४), ६-४, ७-५ असा विजय मिळवला. त्सित्सिपासने जपानच्या टारो डॅनिएलवर ७-६ (७-५), ६-४, ७-५ असा विजय साकारला. तर,इटलीच्या फॅबिओ फोगनिनीकडून नॉर्वेच्या कॅस्पर रूडला ६-४, ७-५, ६-७ (१-७), ६-३ असे पराभूत व्हावे लागले.





