तुम्ही जर ‘हे’ काम केले नसेल तर दोन दिवसात तुमचे ‘पॅन कार्ड’ होणार रद्द; वाचा काय आहे नक्की बातमी

नवी दिल्ली : पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले असून 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पॅन कार्ड त्यांच्या आधारला लिंक करावे लागणार आहे. तसे जर नाही केल्यास त्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. गेल्या आठवड्यात लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
आपल्या पॅन कार्डला आधारशी लिंक खालील प्रकारे करता येईल.
1. आयकर ई-फायलिंग वेवसाइट
2.567678 किंवा 56161 या नंबरला sms करून.
जर मोबाईलच्या माध्यमातून लिंक करायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाइप करा आणि 567678 किंवा 561561 या नंबरवर sms पाठवा.
ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येईल
1. आयकरच्या वेबसाइटला https://incometaxindiaefiling.gov.in भेट द्या.
2. त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा पर्याय समोर येईल. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल.
3. त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल.
4.त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल.




