जिद्द असावी तर अशी.! कठीण परिस्थिती सुद्धा तरुणाने असा केला अभ्यास; मिळवल्या एकापाठोपाठ दोन सरकारी नोकऱ्या

आंध्रप्रदेश – जर मनामध्ये जिद्ध, चिकाटी, आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता याचे उत्तम आंध्रप्रदेशातील एका तरुणाने दाखवून दिले आहे. बोन्था तिरुपती रेड्डी असे या तरुणाचे नाव असून त्याने दोन वेळा भारतीय रेल्वे मध्ये नोकरी मिळवली आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही कोचिंग क्लासचे मार्गदर्शन न घेता हे यश संपादन केले आहे.
यूट्यूबचा वापर करत केली परीक्षेची तयारी…
आत्ताच्या काळात सोशल मीडिया तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा जास्तीचा वापर धोकादायक आहे असे आपण सतत म्हणत असतो परंतु त्याचा याच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत बोन्था रेड्डी यांनी आपल्या यशाला गवसणी घातली आहे. त्यांनी विविध यूट्यूब चॅनलचा वापर करत परीक्षेसाठी लागणाऱ्या गोष्टीचा अभ्यास केला. घरची आर्थिक परिस्तिथी बिकट असल्यामुळे बोन्था रेड्डी यांनी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
मंदिरात बसून तासंतास केला अभ्यास…
बोन्था रेड्डी यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. तसेच त्यामुळे त्यांनी वडिलांना शेतीत मदत करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या शेताजवळ एक मंदिर होते. त्या मंदिरामध्ये मोबाईल ला नेटवर्क चांगले मिळत होते तसेच वातावरण शांत असल्यामुळे तिथेच 10 ते 12 तास अभ्यास करू लागले. आणि भारतीय रेल्वे मधील दक्षिण-पश्चिम रेल्वे, बेंगळुरू विभागात ग्रेड-IV सहाय्यक आणि एक व्यावसायिक कम तिकीट लिपिक म्हणून अश्या दोन नोकऱ्या मिळवत यश संपादन केले आहे.





