Praveen Gaikwad attack : “आम्ही आडवे पडलो नसतो तर….”; अजित दादांची भेट घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितला तो थरारक प्रसंग

Praveen Gaikwad attack : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये तोंडाला काळं फासत हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. या घटनेवरून संतप्त प्रतक्रिया समोर आल्या आहेत. संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळून आली होती. या घटनेचा निषेधही नोंदविण्यात आला.
हल्लेखोरांवरून मोकक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आले असताना संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
गायकवाड यांच्यावरील हल्ला कसा प्लॅन करण्यात आला होता. तो थरारक घटनाक्रम अजित पवार यांना सांगितला. जेव्हा प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करण्यात आली, तेव्हा आम्ही ती फेकणाऱ्यांना विरोध केला. त्यावेळी शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाडांना सोडून आम्हाला बेदम मारहाण केली, असे संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे आणि जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी सांगितलं.
तेच त्यांचं टार्गेत होतं
दरम्यान, यावेळी आडवे आलो नसतो तर हल्लेखोरांनी प्रवीण गायकवाड यांचा खून केला असता असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. तेच त्यांचं टार्गेत होतं, असेही त्यांनी सांगितलं आहे. प्रवीण गायकवाड हे १३ जुलै या दिवशी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासल्याचा आरोप होत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
१३ जुलै या दिवशी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील कमलाराजे चौकात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातो. ते नाव बदलावे तसेच स्वामी समर्थांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा राग मनात धरून शिवधर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं.
हेही वाचा : पाकिस्तानमध्ये पुन्हा महागाईचा भडका ! सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात भरघोस वाढ ; पंपावर लांबच लांब रांगा





