Lok sabha election 2024 : आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर कमी दरात चांगल्या दर्जाची दारू उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन तेलुगु देशम पक्षाचे सर्वेसर्वा एन. चंद्राबाबू नायडू यांनी कुप्पम येथील प्रचारसभेत दिल्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. | chandrababu naidu liquor announcement
आंध्र प्रदेशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. अशातच निवडून येण्यासाठी अतार्किक आश्वासने देण्याची राजकीय पक्षांमध्ये जणू चढाओढच लागली आहे. आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत.
जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारवर ताशेरे ओढत तेलगू देसम पक्षाचे प्रमुख नायडू यांनी सरकारवर दारूच्या किमती वाढल्याचा आरोप केला असून दारूच्या गुणवत्तेत घसरण झाल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार निकृष्ट दर्जाची दारू पुरवत आहे. तर वाढलेल्या किमतीतून खासगी उद्योजकांच्या नफेखोरीला उत्तेजन दिले जात आहे. | chandrababu naidu liquor announcement
अहवालानुसार, २०१९-२० मधील १७,००० कोटी रुपयांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये राज्य सरकार उत्पादन शुल्क महसूलाद्वारे सुमारे २४,००० कोटी रुपये कमावणार आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१९ मध्ये सत्तेवर आले होते. | chandrababu naidu liquor announcement
दारूची किंमत ६० रुपयांवरून २०० रुपयांवर
चंद्राबाबू नायडू म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत आल्यास दारूबंदी करण्याच्या त्यांचे निवडणुकीतील आश्वासन ते विसरले आहेत. मद्याच्या दरांसह सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यांना दारूचे भाव कमी करायचे आहेत. जगन मोहन रेड्डी यांनीच दारूची किंमत ६० रुपयांवरून २०० रुपयांवर आणली आणि १०० रुपये स्वत:च्या खिशात टाकले.
राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवताना चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक रॅलीदरम्यान सांगितले की सध्याचे सरकार हलक्या दर्जाचे मद्य पुरवून आमच्या लोकांचे आरोग्य बिघडवत आहेत. आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी, केवळ दर्जेदार मद्यासाठीच नाही तर आम्ही दर कमी करण्याचे वचन देतो.
“दिल्लीमध्ये करणार पक्ष प्रवेश..” भाजपात जाण्याबाबत एकनाथ खडसेंना दिली कबुली
लॅम्बोर्गिनी आणि डॉली चहावाला सुसाट ! Video होतोय तुफान व्हायरल..