Rajeshwari Kharat : ‘…असं काही झालं तर मी खूप रडते’; फँन्ड्रीफेम अभिनेत्रीने केला ‘तो’ अनुभव शेअर
Rajeshwari Kharat : इंडस्ट्रीतील ग्रृपनिझमवर फँन्ड्री फेम अभिनेत्रीने परखड भाष्य करत एक अनुभव शेअर केला आहे.

Rajeshwari Kharat दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँन्ड्री चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सतत चर्चेत असते. ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे. तिने या मुलाखतीत चित्रपट इंडस्ट्रीतील ग्रृपनिझमवर भाष्य करत आपले मत व्यक्त केले आहे. तसेच ग्रृपनिझमचा आलेल्या एक अनुभव शेअर केला आहे.
सध्या इंडस्ट्रीत त्याच त्याच लोकांना काम दिलं जातं. त्यामुळे ग्रृपनिझन सुरू असल्याची चर्चा होते. अनेक कलाकार यावर उघडपणे बोलत असतात. अशातच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला देखील अनेकदा या गोष्टीचा फटका बसला आहे. Rajeshwari Kharat
“सतत याचा फटका बसतो. चित्रपट आणि फिल्म बॅकग्राऊंड याच्याशी संबंध नसल्यामुळे माझे निर्णय मला स्वतः घ्यावे लागतात. मी कोणत्या ग्रृपची मेंबर नाहीये आणि ग्रृपनिझम बॅालिवूड आणि साउथमध्ये आहे तर मराठीत पण आहे खूप जास्त आहे.” असे परखड मत तिने व्यक्त केले.
लोकं मला म्हणाली तू पण आमच्या ग्रृपची मेंबर हो, मग आपण ग्रृपने काम करत जावू. त्यानुसार काम केले तर ते चुकल्यासारखं वाटतं. ते बरोबर नाही, पण काम मिळतं नाही तेव्हा ठीक आहे, असेही ती म्हणाली. Rajeshwari Kharat
Rajeshwari Kharat : ‘…असं काही झालं तर मी खूप रडते’; फँन्ड्रीफेम अभिनेत्रीने केला ‘तो’ अनुभव शेअर
ग्रृपनिझममुळे तिच्याकडे आलेली अनेक काम गेली असल्याचे तिने सांगितले. एक अनुभव शेअर करताना ती म्हणाली, मला दोन तीन मराठी सिरीअल्सच्या अॅाफर्स आल्या होत्या. ग्रृपनिझममुळे त्या गेल्या. कारण काय तर जिला कास्ट केलं गेलं तिचं बॅकग्राऊंड फिल्म इंडस्ट्रीचं होंत.
असं काही झालं ना तर मी रडते. मी खूप इमोशनल आहे. खूप वाईट वाटत. पण तेवढी मी स्ट्राँगपण आहे, ते सोडून देऊन दुसऱ्या कामवार लक्ष केंद्रीत करते. असे सांगत तिने यावर मात करत पुढे जात असल्याचे सांगितले.




