राजेश्वरी खरातच्या ‘मेरी जान’ रीलने सोशल मीडियावर धुमाकूळ; सौंदर्य आणि अदांनी वेधले लक्ष, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Actress Rajeshwari Kharat : फँन्ड्रीफेम अभिनेत्री राजेश्वरी खरात नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. राजेश्वरी तिच्या आयुष्यातील गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. तसेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमुळे ती सतत चर्चेतही असते. नुकतेच राजेश्वरीने इन्स्टावरुन एक रील शेअर केली आहे. राजेश्वरीने आलिया भटच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील मेरी जान या गाण्यावर हे रील शूट केले आहे. सोशल मीडियावर तिचे नवं रील व्हायरल होत असून चाहत्यांनी कमेंट्चा पाऊस पाडला आहे.
राजेश्वरीने या गाण्यातून तिच्या सौंदर्यांची झलक दाखवून दिली आहे. मेरी जान या गाण्यावर राजेश्वरीच्या रीलमधील अदांवर चाहते फिदा झाले आहेत. तिच्या रीलला नेटकऱ्यांनी लाइक करत कमेंट्स केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राजेश्वरी खरातला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, तिने कोणाताही धर्म बदलेला नाही, मी ख्रिश्चन कुटुंबातचं जन्मले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला ट्रोल करणाऱ्यांना देखील तिने चांगलचं सुनावलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर अभिनेत्री राजेश्वरी खरात आणि अभिनेता सोमनाथ अवघडे या दोघांंचे हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, या व्हायरल फोटोवर खुलासा करत राजेश्वरीने नवे प्रोजेक्टमध्ये काम करत असल्याचे एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. सध्या तिचे मेरी जान हे रीलमधील गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : “ही वेळ मराठी भाषेत….”; विद्या बालनच्या रीलने साधलं टायमिंग, मराठमोळ्या लूकमध्ये काय म्हणाली पाहा…





