“जर कोणी राहत असेल तर..” ‘सातपुडा’च्या प्रतिक्षेत असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्यापही सरकारी बंगला सोडलेला नाही. 4 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर 15 दिवसांत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. मात्र ५ महिने लोटल्यानंतरही त्यांनी मलबार हिल येथील सातपुडा हा शासकीय बंगला अद्याप सोडलेला नाही.
तर दुसरीकडे मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी सोपवण्यात आलेले छगन भुजबळ मात्र गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिकिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावे आणि निवासस्थाने कुठे असावे या संदर्भातली व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला 15-20 दिवसांनी तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आल्याचे पत्र दिले होते. पण एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे.” Chhagan Bhujbal |
मी काय तक्रार करणार?
“मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. याबाबत अजित पवारांनी विचारलं पण मी म्हटलं की, घर खाली झालं की जाईन. आमचे ते पक्षातले सहकारी आहेत. मी काय तक्रार करणार? मी फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं एखादं छोटं मोठं घर असेल तर द्या. मुख्यमंत्री काय निर्णय घेतील ते पाहू,” असे त्यांनी म्हटले.
याबद्दल धनंजय मुंडे यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचे सांगितले. Chhagan Bhujbal |
४२ लाख रुपये दंड
दरम्यान, ‘सातपुडा’ बंगल्याचे क्षेत्रफळ ४ हजार ६६७ चौ. फूट आहे. नियमांनुसार, मंत्र्यांनी १५ दिवसांत बंगला सोडला नाही, तर त्यांना प्रति चौ. फूट २०० रुपये दंड आकारला जातो. यामुळे मुंडे यांना महिन्याला ९ लाख ३३ हजार रुपये दंड बसत आहे, त्यानुसार आता ही रक्कम ४२ लाख झाली आहे. Chhagan Bhujbal |
हेही वाचा :
“कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा…”; दादरमधील कबुतरखान्यावरील कारवाईनंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट





