“अर्धा तास उशीर केला असता तर…”; नंदेश उपम यांना कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका, सांगितला ‘तो’ प्रसंग

Nandesh Umap : मराठी अभिनेते अमोल बावडेकर यांना हार्ट अॅटक येऊन गेला आहे. ते आता पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना नाटकाचे प्रयोग करताना हार्ट अॅटक आला होता. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं, याविषयी त्यांनी सांगितले होते. अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील अनेक गाणी ज्यांनी गायली आहेत, अशा प्रसिद्ध गायक अभिनेते नंदेश उमप यांना देखील काही महिन्यांपूर्वी हार्ट अॅटक आला होता. चालू कार्यक्रमादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. याबाबत त्यांनी राजश्री मराठी वाहिनीला मुलाखत देताना तो प्रसंग सांगितला
नंदेश उपम हे शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत. त्यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी नेमकं काय घडलं होतं याविषयी सांगितले. खूप मोठा आघात होता माझ्यासाठी आणि मला माहित नव्हतं काय होतंय, असे ते म्हणाले. मला दोन दिवसाआधी ६ तारखेला पाठीत दुखत होतं आणि ९ तारखेला मला खूपच प्रचंड दुखायला लागलं. मी एका कार्यक्रमाला जात होतो. तिथे प्रचंड त्रास झाला आणि तो त्रास झाल्यानंतर माझा श्वास जड होत होता. तिथून मला ज्युपिटर हॅास्पिटलला घेऊन आले.
आणखी जर आपण अर्धा तास उशीर केला असता तर…असे त्यांची पत्नी सरिताने सांगितले. यावर ते बोलताना म्हणाले, पण मला नव्हतं ना जायचं, असा दृढ विश्वास त्यांना होता. तसेच नंदेश उमप यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन करत आपल्याला कळत नाही काय होतं. आपण बॉडी चेकअप करणं गरजेचे आहे, असा सल्ला दिला.
आईची आठवण सांगताना झाले भावुक
हे सगळं होण्याआधी माझी आई गेली. माझ्या आईने मला दोनवेळा वाचवलं. मला ह्यावेळीसुद्धा असं वाटतं की, माझी आई म्हणाली असेल तू थांब मी जाते, अशी आठवण नंदेश उपम यांनी सांगितली. यावेळी ते भावुक झाले होते.
हेही वाचा : Pimpri : पालिकेच्या दोन प्रभागांच्या आरक्षणामध्ये बदल; राज्य निवडणूक आयोगाची सूचना





