Asaduddin Owaisi in Bihar | बिहारमध्ये महाआघाडीच्या उपमुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावरून राजकीय कलह सुरू झाला आहे. यावरून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हल्लाबोल केला आहे. एका निवडणूक सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी, जर मल्लाहचा मुलगा उपमुख्यमंत्री होऊ शकतो, तर मोहम्मदचा मुलगा उपमुख्यमंत्री का होऊ शकत नाही?, असा सवाल केला आहे. बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चेहऱ्यांची घोषणा केली आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री तर मुकेश सहनी यांना उपमुख्यमंत्री चेहरा निवडले आहे. याच मुद्द्यावरून ओवैसी यांनी महाआघाडीला घेरले आहे. Asaduddin Owaisi in Bihar | ओवैसींचा महाआघाडीवर हल्लाबोल ओवैसी यांनी ढाका येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. ते येथे AIMIM च्या हिंदू उमेदवार राणा रणजीत यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी आले होते. यावेळी ओवैसी म्हणाले, “बिहारमध्ये मल्लाह समाजाची लोकसंख्या ३ टक्के आहे आणि ते उपमुख्यमंत्री होतील. मग जर मल्लाहचा मुलगा उपमुख्यमंत्री होऊ शकतो, तर १७% असलेल्या आजमचा मुलगा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही, मोहम्मदचा मुलगा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही?” तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधत पुढे ओवैसी म्हणाले की, “१४ टक्के असलेल्या यादवांना तुम्ही ३६% तिकीट दिले. जे १७% आहेत त्यांना लॉलीपॉप दिले. तुम्ही १४ टक्के आणि तिकीट देता ३६ टक्के… आम्हाला हिस्सा हवा आहे, समानता हवी आहे. आम्ही कुणाचे गुलाम नाही. आम्ही कुणाचे गुलाम नाही. १५ वर्षे लालू कुटुंबीय मुख्यमंत्री राहिले, २० वर्षांपासून नीतीश कुमार मुख्यमंत्री आहेत. दोनदा तेजस्वी उपमुख्यमंत्री झाले. आम्ही विचारतो की आमची भूमिका काय आहे?,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ओवैसी यांनी आपल्या मुस्लिम मतदारसंघाला सांभाळत म्हटले की, जेव्हा ३ टक्के लोकसंख्या असलेले मल्लाह अट ठेवतात की महाआघाडीत उपमुख्यमंत्री आमचा असेल. तर त्यांच्या राजकीय ताकदीकडे पहा, त्यांच्या राजकीय कौशल्यातून शिका. त्यांनी मुसलमानांना आवाहन केले की ते एकजूट होऊन AIMIM ला मत द्या आणि तेजस्वींकडून दिल्या जाणाऱ्या ‘लॉलीपॉप’पासून वाचून राहा. जंगलराजपासून बिहारला मुक्त करायचे ते पुढे म्हणाले की, “बिहार सरकारचा डेटा सांगतो की २८% लोक स्थलांतर करून जातात. हा तुमचा विकास आहे? ही तुमची डबल इंजिनची सरकार आहे? बिहारमध्ये नीतीश कुमारांची २० वर्षांची सरकार आणि १५ वर्षांची RJD ची लालू कुटुंबाची सरकार. या दोन्ही जंगलराजपासून बिहारला मुक्त करायचे आहे.” AIMIM ने ढाक्यातून हिंदू उमेदवार उतरवला ढाका विधानसभेत असदुद्दीन ओवैसी यांनी हिंदू उमेदवार देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. AIMIM कडून येथून राणा रणजीत सिंह निवडणूक लढवत आहेत. त्यांचा दावा आहे की, त्यांना सर्व वर्गांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्याच प्रचारादरम्यान ओवैसी यांनी हे भाषण दिले आहे. हेही वाचा: तयारीला लागा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; ‘या’ दिवशी आचारसंहिता लागणार?