SSC EXAM : दहावीचा मराठीचा पेपर फुटला ! बोर्डाचा कॅापीमुक्त परीक्षेचा दावा ठरला फोल; कोणत्या ठिकाणी घडला प्रकार?

जालना: आजपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॅापीमुक्त परीक्षेचा दावा फोल ठरला आहे. हा पेपर फुटीचा प्रकार जालना जिल्ह्यातील एका परीत्रा केंद्रावर घडला आहे. या प्रकरणानंतर या प्रकरणी बोर्ड काय अॅक्शन घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
जालन्यातील एका केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माय मराठीचा पहिल्या दिवशी होणाऱ्या मराठीचा पेपर फुटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे बोर्डाने कॅापीमुक्त परीक्षेचा पुरता फज्जा उडाला आहे.
पालकांकडून संताप
परीक्षेसाठी राज्यातील सर्व केंद्रावर बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जालना येथील बदनापूर येथील केंद्रावर पेपर फुटीचा प्रका घडला आहे. पेपर सुरू होण्याच्या अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर येथे असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या. यामुळे आता या प्रकराबद्दल पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षेसाठी बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेपर व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे हा पेपर व्हायरल कसा झाला याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे.





