ICC Women’s World Cup 2022 | पराभवामुळे खूप निराश – मिताली
Updated On:

ऑकलंड – महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळीत झालेल्या पराभवामुळे आमचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले. या पराभवामुळे खूपच निराश झाले, अशा शब्दात भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हीने आपल्या भावना बोलून दाखवल्या.
सचिन तेंडुलकर आणि जावेद मियांदाद यांच्यानंतर सहा विश्वकरंडक स्पर्धा खेळणारी मिताली ही तिसरी क्रिकेटपटू तर पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे. मितालीने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीच या मोसमाच्या अखेरीस निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले होते.
आम्ही या स्पर्धेसाठी जवळपास एका वर्षापेक्षा जास्त काळापासून सातत्याने मेहनत घेत होते. मात्र अशा प्रकारे तुमचा प्रवास संपल्यानंतर खूप निराशा होते. हे स्विकारण्यासाठी थोडा वेळ जावा लागले. मी अजून माझ्या भविष्याबाबत काही विचार केलेला नाही, असेही मिताली म्हणाली.





