ICC T20 Batting Rankings : ICC क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप! सॅमसनची १८ स्थानांची उडी, तर सूर्याची घसरण! क्रमवारीत मोठे फेरबदल
ICC T20 Batting Rankings : या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

ICC T20 Batting Rankings Updates : टी-२० विश्वचषक २०२६ च्या समाप्तीनंतर आयसीसीने खेळाडूंची नवीन टी-२० क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. युवा फलंदाज अभिषेक शर्मा ८७५ रेटिंग गुणांसह अद्यापही जगातील नंबर एकचा फलंदाज आहे. मात्र, त्याला आता आपल्याच संघातील खेळाडू इशान किशनकडून तगडी फाईट मिळत आहे.
इशान किशन आणि संजू सॅमसनची ‘उंच’ भरारी –
या क्रमवारीत इशान किशनने दोन स्थानांची प्रगती करत थेट दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. इशानची रेटिंग आता ८७१ झाली असून अभिषेक आणि इशानमध्ये केवळ चार गुणांचा फरक उरला आहे. दुसरीकडे, ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनने तब्बल १८ स्थानांची मोठी झेप घेत २२ व्या क्रमांकावर धडक मारली आहे. विश्वचषकाच्या शेवटच्या तीन सामन्यांत सलग ८०+ धावा केल्याचा मोठा फायदा संजूला मिळाला आहे.
सूर्या आणि तिलक वर्माला फटका –
The #T20WorldCup 2026 brought a whole host of changes to the latest ICC Men’s Player Rankings 🤩
Read more 👉 https://t.co/cXPm03qnhp pic.twitter.com/V86UtusSBS
— ICC (@ICC) March 11, 2026
एकूण क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला असला तरी, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि युवा तिलक वर्मा यांच्या क्रमवारीत काहीशी घसरण झाली आहे. सूर्या आता दोन स्थानांच्या नुकसानासह नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे, तर तिलक वर्मा सातव्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तानचा साहिबझादा फरहान तिसऱ्या आणि इंग्लंडचा फिल साल्ट चौथ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी टॉप-१० टी-२० फलंदाज (ताज्या क्रमवारीनुसार):
१. अभिषेक शर्मा (भारत) – ८७५
२. इशान किशन (भारत) – ८७१
३. साहिबजादा फरहान (पाकिस्तान) – ८४८
४. फिल साल्ट (इंग्लंड) – ७९२
५. पथुम निसंका (श्रीलंका)
६. टिम सिफर्ट (न्यूझीलंड) – ७४९
७. तिलक वर्मा (भारत)
८. डेवाल्ड ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका)
९. सूर्यकुमार यादव (भारत) – ७२२
१०. जोस बटलर (इंग्लंड) – ७१६





