ICC Month Nominees : ICCच्या यादीतून भारतीय खेळाडू गायब! जुलै महिन्यातील ‘प्लेअर्स ऑफ द मंथ’साठी ‘या’ खेळाडूंना नामांकन
ICC Month Nominees : विशेष म्हणजे, या वेळच्या पुरुष आणि महिला दोन्ही श्रेणींमधील नामांकनांत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.

ICC Player Of The Month July 2026 Nominees Announce : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जुलै २०२६ या महिन्यासाठीच्या ‘आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ’ (ICC Player of the Month) पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा केली आहे. पुरुषांच्या श्रेणीत इंग्लंडचा व्हाईट-बॉल कर्णधार हॅरी ब्रूक (Harry Brook), वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जस्टिन ग्रीव्हज (Justin Greaves) आणि बांगलादेशचा सलामीवीर तंजिद हसन (Tanzid Hasan) यांना नामांकित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या वेळच्या पुरुष आणि महिला दोन्ही श्रेणींमधील नामांकनांत एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.
पुरुषांच्या श्रेणीतील तगडी चढाओढ!
- हॅरी ब्रूक: भारतांविरुद्धच्या व्हाईट-बॉल मालिकेत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या हॅरी ब्रूकने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत तब्बल २२९ धावा ठोकल्या.
- जस्टिन ग्रीव्हज: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १८० धावांची खेळी केल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात १२ धावांत २ विकेट्स घेत विंडीजला विजय मिळवून दिला. जुलै महिन्यात त्याने २ कसोटीत २१५ धावा आणि ८ विकेट्स घेतल्या.
- तंजिद हसन: झिम्बाब्वे दौऱ्यावर बांगलादेशकडून वनडेत १५९ धावा तर टी-२० मालिकेत १४० धावा करत तो दोन्ही मालिकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
Big performers from Bangladesh, West Indies and England are in the running for ICC Men’s Player of the Month for July award 👌
Read more about the nominees ➡️ https://t.co/FK4WAtXUjD pic.twitter.com/kx2CGyOllG
— ICC (@ICC) August 10, 2026
महिलांच्या श्रेणीत ‘या’ ३ खेळाडूंमध्ये थेट लढत!
On-field brilliance from three outstanding cricketers earns them nominations for the ICC Women’s Player of the Month for July 🤩
Read More ➡️ https://t.co/fOv2Soo9mg pic.twitter.com/oIWh9vFnTY
— ICC (@ICC) August 10, 2026
महिलांच्या विभागामध्ये इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट, वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज आणि श्रीलंकेची फलंदाज हर्षिता समरविक्रमा यांच्यात चुरस आहे.
नॅट सायव्हर-ब्रंटने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली.
दुसरीकडे, हेली मॅथ्यूजने आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १५९* धावांची खेळी करत ३ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या सामन्यात १०० धावा अन् २ विकेट्स घेतल्या. तसेच श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमा हिने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १७३ धावा करत ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा किताब जिंकला होता.





