World Cup 2027 Schedule : वनडे वर्ल्डकप २०२७ चं वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, पाहा संपूर्ण वेळापत्रक
World Cup 2027 Schedule : आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना २ ऑक्टोबर रोजी, तर अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

ICC ODI World Cup 2027 Schedule India vs Pakistan On 10 October 57 Matches : आयसीसीने आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२७ (ODI World Cup 2027) च्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणारी ही महास्पर्धा २ ऑक्टोबर (गांधी जयंती) पासून सुरू होणार असून, स्पर्धेचा महाअंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. ५० दिवसांहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५७ सामने होणार आहेत. क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज महामुकाबला रविवार, १० ऑक्टोबर रोजी रंगणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
भारत अन् पाकिस्तान एकाच गटात; ‘ग्रुप ए’ ठरला ग्रुप ऑफ डेथ!
विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. भारताचा समावेश ‘ग्रुप ए’मध्ये असून, त्यांच्यासोबत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर ‘ए’ संघ असणार आहे. दुसऱ्या बाजूला ‘ग्रुप बी’मध्ये यजमान दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि क्वालिफायर ‘बी’ संघांचा समावेश आहे.
तीन देश करणार संयुक्त आयोजन; दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक सामने!
𝙈𝘼𝙍𝙆 𝙔𝙊𝙐𝙍 𝘾𝘼𝙇𝙀𝙉𝘿𝘼𝙍𝙎 🗓️
The ICC Men’s #CWC27 fixtures have been unveiled 🏆
Access the ticket ballot 🎫 https://t.co/MSLEQzcObb pic.twitter.com/dpTE4TEjO7
— ICC (@ICC) October 1, 2026
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे तीन देश संयुक्तपणे करणार आहेत. यातील सर्वाधिक सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले जातील. सध्या २०२३ चा विजेता ऑस्ट्रेलिया संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. या स्पर्धेत एकूण १४ संघ सहभागी होणार असून मुख्य फेरीपूर्वी सर्वात खालच्या ३ रँकिंग संघांमध्ये सुपर सिरीज खेळवली जाईल. त्यातील दोन संघ बाहेर पडल्यानंतर उर्वरित १२ संघांमध्ये मुख्य लढती रंगतील.
सुपर ७ फेरी अन् थेट उपांत्य लढत; असा असेल स्पर्धेचा नवा फॉरमॅट!
मुख्य फेरीतील १२ संघांमधून दोन्ही गटांतील अव्वल ३-३ संघ आणि उर्वरित संघांमधून सर्वोत्तम गुणांचा एक संघ असे एकूण ‘सुपर ७’ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर ७ फेरीत सर्व संघ एकमेकांशी एक-एक सामना खेळतील आणि त्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. उपांत्य फेरीतील विजेत्यांमध्ये २१ नोव्हेंबरला विश्वविजेतेपदाची अंतिम लढत होईल.





