Kranti Gaud Fine : आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाला धक्का! ICC ची ‘या’ खेळाडूवर मोठी कारवाई; नेमकं कारण काय? जाणून घ्या
Kranti Gaud Fine : आयसीसीने भारताच्या वेगवान गोलंदाजावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईचं नेमकं का करण काय आहे? जाणून घेऊया

ICC Fines Kranti Gaud 10 Percent Match Fee Over Aggressive Send Off In Women Asia Cup Final : महिला टी-२० आशिया चषक २०२६ च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून भारताने जेतेपद पटकावले खरे; पण या विजयानंतर भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडवर (Kranti Gaur) आयसीसीने दंडात्मक कारवाई केली आहे. सामन्यादरम्यान आचारसंहितेचे (Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी क्रांतीच्या मॅच फीच्या १० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. याचं कारण नेमकं काय आहे? जाणून घेऊया.
आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन; क्रांतीच्या खात्यात १ डिमेरिट पॉईंट!
क्रांती गौडला आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम २.५ (Article 2.5) नुसार लेव्हल-१ च्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आहे. हा नियम फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्यासमोर अनुचित किंवा आक्षेपार्ह हावभाव करणे आणि त्याला चिथावणी देण्याशी संबंधित आहे. तिने श्रीलंकेच्या डावातील पहिल्याच षटकात फलंदाज इमीशा दुलानीला बाद केल्यानंतर आक्रमक शैलीत पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा करत जल्लोष केला होता, जो आता तिला महागात पडला आहे. क्रांतीने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच नियमांचा भंग केल्यामुळे दंडासह तिच्या खात्यात १ डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं? पहिल्याच षटकात पेटला होता वाद!
🚨 BREAKING 🚨
Kranti Gaud breached Level 1 of the ICC Code of Conduct during the Women’s Asia Cup final against Sri Lanka.
After dismissing Imesha Dulani in the first over of Sri Lanka’s innings, Gaud gestured towards the pavilion, leading to a Level 1 breach.
One demerit… pic.twitter.com/Z6fuRpjmGJ
— Sportskeeda (@Sportskeeda) September 14, 2026
श्रीलंकेच्या डावातील पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर इमीशा दुलानीने फाईन लेगच्या दिशेने चौकार ठोकला होता. मात्र, तीन चेंडूंनंतर पुन्हा तोच फटका मारण्याच्या नादात ती बाद झाली. विकेट मिळताच क्रांतीने अत्यंत रागात दुलानीला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा आक्रमक इशारा (Send-off) केला. सामनाधिकारी सुप्रिया राणी दास यांनी कारवाईची शिफारस केल्यानंतर क्रांतीने आपली चूक तत्काळ मान्य केली; त्यामुळे वेगळी अधिकृत सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.
पाकिस्तान संघालाही दणका; स्लो ओव्हर रेटमुळे ५ टक्के दंड!
दुसऱ्या बाजूला, श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संथ गोलंदाजी (Slow Over-Rate) केल्याबद्दल पाकिस्तान महिला संघावरही ५ टक्के दंडाची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानचा संघ निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे राहिल्याचे निष्पन्न झाले होते. कर्णधार फातिमा सनाने ही चूक विनाविरोध स्वीकारल्याने हा दंड निश्चित करण्यात आला.





