Women Asia Cup : भारताच्या वाघिणींनी दुबईत फडकवला तिरंगा! श्रीलंकेवर एकतर्फी वर्चस्व गाजवत ८ व्यांदा आशिया कपवर कोरलं नाव
Women Asia Cup : २०२४ च्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा टीम इंडियाने अखेर व्याजासकट बदला घेतला असून विक्रमी आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले आहे.

India Beat Sri Lanka By 72 Runs To Win Women Asia Cup 2026 Title For 8th Time : भारतीय महिला क्रिकेट संघाने दुबईच्या स्टेडियमवर दमदार कामगिरी करत महिला आशिया चषक २०२६ (Women’s Asia Cup 2026) चे जेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारताने गतविजेत्या श्रीलंकेचा तब्बल ७२ धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावांचा डोंगर उभारला होता. आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अखेरच्या षटकात अवघ्या १११ धावांत गारद झाला. २०२४ च्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा टीम इंडियाने अखेर व्याजासकट बदला घेतला असून विक्रमी आठव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले आहे.
शफाली-मानधनाची १२९ धावांची ऐतिहासिक भागीदारी –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताला स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या सलामीच्या जोडीने तुफानी सुरुवात मिळवून दिली. दोघींनी अवघ्या १२.५ षटकांत १२९ धावांची शतकी भागीदारी रचत महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम नोंदवला. शफाली वर्माने अवघ्या २४ चेंडूंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. तिने ३९ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची स्फोटक खेळी साकारली.
स्मृतीचे शानदार अर्धशतक; कमलिनीच्या अखेरच्या षटकाराने गाठला १८३ धावांचा पल्ला –
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦 🏆
A flawless campaign capped by sheer brilliance 🇮🇳🥳
Congratulations to #TeamIndia on winning the #WomensAsiaCup 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/knKLXGSfOd #INDvSL pic.twitter.com/O3KaZ0oA3p
— BCCI Women (@BCCIWomen) September 13, 2026
शफालीला दुसऱ्या बाजूने तोलामोलाची साथ देत उपकर्णधार स्मृती मानधनाने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावा कुटल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर (१४) आणि ऋचा घोष (१७) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या. मात्र, अखेरच्या षटकात गुणालन कमलिनीने अवघ्या ५ चेंडूंत १ षटकारासह नाबाद १५ धावा चोपल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर कमलिनीने उत्तुंग षटकार खेचून भारताचा स्कोअर ५ बाद १८३ पर्यंत नेऊन ठेवला.
श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली; भारतीय गोलंदाजांसमोर १११ धावांतच टेकले गुडघे –
#TeamIndia inching closer to victory 🔢
Shafali Verma 🤝 Sree Charani with the wickets 🙌
Updates ▶️ https://t.co/knKLXGSfOd #WomensAsiaCup | #INDvSL pic.twitter.com/zNEldRhcbD
— BCCI Women (@BCCIWomen) September 13, 2026
प्रत्युत्तरात १८४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळती झाली. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची आघाडी फळी एकापाठोपाठ एक तंबूत परतली. कर्णधार चमारी अटापट्टूसह त्यांचे प्रमुख फलंदाज भारतीय फिरकीपुढे निष्प्रभ ठरले. संपूर्ण श्रीलंकन संघ २० व्या षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून श्री चरणीने सर्वाधिक ४ आणि दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर क्रांती, शफाली आणि प्रेमा रावतने प्रत्येकी एक विकेट्स घेतली. ज्यामुळे भारताने ७२ धावांनी विजय साजरा करत दिमाखात चषक उंचावला.





