ICC Awards 2023 Winners : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरूवारी अनेक पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये विराट कोहली आणि पॅट कमिन्सची सर्वाधिक चर्चा झाली. कोहलीला 2023 साठी ‘ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ हा किताब देण्यात आला. दरम्यान नुकत्याच झालेल्या आणि 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात, सर्वाधिक धावा करून कोहलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.
Player of the tournament at the ICC Men’s @cricketworldcup 2023 😎
The extraordinary India batter has been awarded the ICC Men’s ODI Cricketer of the Year 💥 https://t.co/Ea4KJZMImE
— ICC (@ICC) January 25, 2024
याशिवाय ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सची 2023 साठी ‘ICC क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड करण्यात आली. कमिन्सने 2023 मध्ये शानदार कामगिरी केली. कमिन्स एक कर्णधार म्हणून तसेच गोलंदाज म्हणूनही खूप यशस्वी ठरला. कमिन्सने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला 2023 मध्ये दोन ICC ट्रॉफी (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023) जिंकून दिल्या. याशिवाय त्याने आपल्या कर्णधारपदाखाली ऍशेस राखला. कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर 2023 पर्यंत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन बनला होता.
2023 मध्ये कमिन्सची कामगिरी…
कमिन्सने 2023 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 24 सामने खेळले. 32 डावांमध्ये गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 30.05 च्या सरासरीने 59 विकेट घेतल्या. याशिवाय, 28 डावांमध्ये फलंदाजी करताना, कमिन्सने 21.10 च्या सरासरीने 422 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा उच्च स्कोअर 44* धावा होता.
A career-defining year for his country 🇦🇺
Pat Cummins is the ICC Men’s Cricketer of the Year for 2023 🏆
More ➡ https://t.co/UA73XrYyrE pic.twitter.com/PXlWCCgSqA
— ICC (@ICC) January 26, 2024
उर्वरित आयसीसी पुरस्कार विजेते…
आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- विराट कोहली (भारत)
आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- सूर्यकुमार यादव (भारत)
आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर 2023- रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
आयसीसी एसोसिएट क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- बास डी लीडे (नेदरलँड)
आयसीसी स्प्रिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड 2023-झिम्बाब्वे
आयसीसी अंपायर ऑफ द ईयर 2023- रिचर्ड इलिंगवर्थ.
आयसीसी पुरस्कारांमध्ये महिला क्रिकेटपटूंनीही मारली बाजी…
आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- नेट साइवर-ब्रंट (इंग्लंड)
आयसीसी एसोसिएट क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- क्वीनटोर एबेल (केनिया)
आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- हीली मैथ्यूज (वेस्टइंडीज)
आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- फोबे लिचफील्ड (ऑस्ट्रेलिया)
आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर 2023- चमारी अटापट्टू (श्रीलंका)