IAS Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली
IAS Transfers : राज्य सरकारने प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा मोठा फेरबदल केल्याचे मानले जात आहे. नवीन नियुक्त अधिकाऱ्यांसमोर स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे.

IAS Transfers : राज्य सरकारने एकाच वेळी 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. दोन दिवसांपूर्वीच 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर हा आणखी एक मोठा निर्णय मानला जात आहे. या बदल्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर यांसारख्या प्रमुख शहरांच्या प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत.
कोणाची कुठे बदली?
*जी. श्रीकांत : छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त पदावरून नवी मुंबई येथे जल जीवन मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी
*दिलीप स्वामी : छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी पदावरून अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
*वर्षा ठाकूर-घुगे : लातूर जिल्हाधिकारी पदावरून मुंबई येथे एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी
*दीपक सिंगला : पीएमआरडीए, पुणे येथून नागपूर येथे मनरेगा आयुक्त
*के. मंजुलक्ष्मी : कोल्हापूर महापालिका आयुक्त पदावरून पीएमआरडीए, पुणे येथे अतिरिक्त आयुक्त
*डॉ. राजेंद्र भारूड : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई येथून कोल्हापूर महापालिका आयुक्त
*डॉ. प्रवीणकुमार देवरे : पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदावरून बुलढाणा जिल्हाधिकारी
*डॉ. भरत बास्टेवाड : नागपूर मनरेगा आयुक्त पदावरून लातूर जिल्हाधिकारी
*वर्षा लड्डा : पुणे येथून अमरावती महापालिका आयुक्त
*अमोल येडगे : कोल्हापूर जिल्हाधिकारी पदावरून छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त
*डॉ. विजय राठोड : एमआयडीसी, मुंबई येथून कोल्हापूर जिल्हाधिकारी
*विनय गौडा जी.सी. : चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी
*डॉ. किरण पाटील : बुलढाणा जिल्हाधिकारी पदावरून पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्त
*डॉ. मंगेश गोंदावले : एमआयडीसी, मुंबई येथून गोंदिया जिल्हाधिकारी
*कुमार आशीर्वाद : सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून नागपूर जिल्हाधिकारी
*वसुमना पंत : नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून चंद्रपूर जिल्हाधिकारी
*प्रजित नायर : गोंदिया जिल्हाधिकारी पदावरून पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त
*अंकित : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सीईओ पदावरून नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्त
*कार्तिकेयन एस. : कोल्हापूर जिल्हा परिषद सीईओ पदावरून सोलापूर जिल्हाधिकारी
*संजीता महापात्रा : अमरावती जिल्हा परिषद सीईओ पदावरून सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आयुक्त
*मिन्नू पी. एम. : जालना जिल्हा परिषद सीईओ पदावरून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सीईओ
*सत्यम गांधी : सांगली महापालिका आयुक्त पदावरून अमरावती जिल्हा परिषद सीईओ
*जस्मिन : राजापूर (रत्नागिरी) सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरून कोल्हापूर जिल्हा परिषद सीईओ
*अंजली शर्मा : जालना महापालिका आयुक्त
*कृष्णकांत कनवारिया : शहादा (नंदुरबार) सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरून जालना जिल्हा परिषद सीईओ
एकूणच, राज्य सरकारने प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने हा मोठा फेरबदल केल्याचे मानले जात आहे. नवीन नियुक्त अधिकाऱ्यांसमोर स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे.





