“मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर…”; ‘बॉम्बे’ म्हणणाऱ्या अनामलाईंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

K Annamalai On Mumbai | तामिळनाडूतील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष के अण्णामलाई यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली. त्यादरम्यान त्यांनी मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत हे शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वक्तव्य केलं.
तसेच मुंबईच्या व्यवस्थापनेसाठी योग्य लोक बीएमसीमध्ये बसवावे लागतील असंही अण्णामलाई म्हणाले. यावर रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अनामलाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अनामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान
“मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असं म्हंटले की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणार…”, असे थेट आव्हानच अनामलाई यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
&nb
Chennai, Tamil Nadu | Responding to MNS Chief Raj Thackeray’s remarks against him, BJP leader K Annamalai says, “Who are Aaditya Thackeray and Raj Thackeray to threaten me? I am proud to be a farmer’s son. They have organised meetings just to abuse me. I don’t know whether I have… pic.twitter.com/O6QFK9ebxw
— ANI (@ANI) January 12, 2026
“हिम्मत असेल, तर माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहा. धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही?” अशा शब्दांत अनामलाई यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले.
दरम्यान, “काल परवा तामिळनाडूतून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय? भ*व्या तुझा काय संबंध येथे यायचा,” असा सवाल राज ठाकरे यांनी सभेत केला होता.
अनामलाई मुंबईत काय म्हणाले होते?
भाजपा नेते के. अनामलाई म्हणाले होते, “मुंबई हे देशातील एकमेव असं शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५ हजार कोटी असून ही लहान रक्कम नाही. चेन्नईचे बजेट ८ हजार कोटी तर बंगळुरू १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील.” त्यांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा:





