Amol Bawdekar : मला तशा वेदना होत नव्हत्या पण…; अभिनेते अमोल बावडेकरांनी शेअर केला तो अनुभव

अभिनेते अमोल बावडेकर यांच्यावर अँलिओग्राफी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॅाक्टरांनी सांगितलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय झालं होतं याविषयी त्यांनी अनुभव शेअर केला आहे. नुकतीच अभिनेते अमोल बावडेकर यांनी राजश्री मराठी या वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी याबाबत सांगितलं आहे.
एखादा ढेकर आला तर बरं वाटेल!
मला तीन तास द्या, असं बावडेकर डॅाक्टरांना म्हणाले होते. खरंतर कोणताही कलाकार आपल्या कलेप्रती किती कमेंटमेंन्ट असतो हे त्यांच्या वाक्यातून जाणवतं. मला तशा वेदना होत नव्हत्या का? हे मला पण माहित नाही; परंतु मी तंदुरुस्त असल्यामुळे असेल कदाचित. मला गॅसेसचा त्रास तेवढचा होत होता, त्यामुळे एखादा ढेकर आला तर बरं वाटेल! इतका मी बरा होतो.
आई… माझ्या छातीत दुखतयं असं कोणीची करणार नाही
इथून तीन माळे उतरून मी खाली गेलो, तिथून हॅास्पिटलाचा एक माळा चढून गेला. तिथे डॅाक्टर मला म्हणाले, चालू नका असं. पण आई… माझ्या छातीत दुखतयं असं कोणीची करणार नाही; एवढा मेलोड्रोमा कोणी नाही करणार आणि मला त्रास होत नव्हता. डॅाक्टरांनी फस्टस्टेट केल्यानंतर मला एकदम बरं वाटायला लागंल आता मी बोलतोय तेवढा नॅार्मल झालो होतो, असं बावडेकरांनी सांगितलं.
औषध घेऊन मी परत येऊ शकतो का?
मी डॅाक्टरांना विचारलं की हा शेवटचा प्रयोग मी करू शकतो का? १९९९ साली पहिल नाटक कट्यार काळजात घुसली हे केलं होतं. तेव्हापासून हा पहिलाच प्रयोग आहे जो कॅन्सल झाला, त्यामुळे मला मनात हुरहुर लागली आणि मी आता बरा आहे म्हणून मी डॅाक्टरांनी विचारलं असंच काही औषध घेऊन मी परत येऊ शकतो का? असं त्यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याविषयी त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : “तुझा चेहरा फोडीन, तू चल बाहेर…” ; ट्रम्पच्या डिनर पार्टीत हाणामारी, अर्थमंत्र्यांची अधिकाऱ्यांशी बाचाबाची





