Kangana On Ranveer : “माझ्यावर संपूर्ण इंडस्ट्रीने बंदी घातली होती. पण…”; रणवीर सिंहच्या बंदी वादावर कंगनाचं मोठं वक्तव्य
Kangana On Ranveer : अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीदेखील या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

Kangana On Ranveer : फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन 3’ चित्रपटातून बाहेर पडल्यापासून अभिनेता रणवीर सिंह सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला अवघे काही दिवस शिल्लक असताना रणवीरने अचानक चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे चित्रपटाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
यानंतर फरहान अख्तरच्या तक्रारीवरून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीरविरोधात असहकाराची भूमिका घेतल्याचं वृत्त समोर आलं. यामुळे इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांना रणवीरसोबत कोणत्याही काम करण्यापासून रोखण्यात आलं आहे. (Kangana On Ranveer)
यानंतर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी रणवीरची बाजूही घेतली आहे. दरम्यान, अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिने देखील या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. (Kangana On Ranveer)
हेही वाचा : Satara: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क साथीच्या आजारांबाबत दक्षता; २४ तास मिळणार आरोग्य सेवा
सध्या कंगना तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याचदरम्यान एका कार्यक्रमात रणवीरविरोधातील फेडरेशनच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंगना म्हणाली, “जर तुम्ही मला विचारत असाल, तर माझ्यावर तर सगळ्यांनीच बंदी घातली होती,” असं ती हसत म्हणाली. पुढे ती म्हणाली, “जशी तुमची प्रतिष्ठा वाढते, तसतसे विरोधकही वाढतात. यशासोबत टीका आणि शत्रू निर्माण होणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही.” (Kangana On Ranveer)
कंगनाचं मोठं वक्तव्य (Kangana On Ranveer)
पुढे बोलताना कंगनाने स्वतःचा अनुभव सांगत रणवीरला धीर देण्याचा प्रयत्न केला.“माझ्यावर संपूर्ण इंडस्ट्रीने बंदी घातली होती. पण मी हार मानली नाही. आज मी जिथे आहे, तिथे समाधानी आणि आनंदी आहे. रणवीरनेही या गोष्टींचा जास्त विचार न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवं. आयुष्यात चढ-उतार येत राहतात, महत्त्वाचं म्हणजे पुढे जात राहणं,” असा महत्वाचा सल्ला दिला.
दरम्यान, फेडरेशनच्या भूमिकेनंतर रणवीर सिंहच्या प्रवक्त्यानेही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, रणवीरला चित्रपटसृष्टीचा आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी संबंधित सर्वांचा मनापासून आदर आहे. “या विषयावर त्याने जाणूनबुजून मौन बाळगलं, कारण व्यावसायिक संबंध आणि वैयक्तिक नाती परस्पर आदराने आणि परिपक्वतेने हाताळली जावीत, असा त्याचा विश्वास आहे. त्याच्याबद्दल विविध तर्क-वितर्क लावले गेले, मात्र त्याने कधीही सार्वजनिक वादात पडणं पसंत केलं नाही. सध्या त्याचं संपूर्ण लक्ष आपल्या कामावर आणि आगामी प्रकल्पांवर आहे,” असं प्रवक्त्याने स्पष्ट केलं.






