“मी कचऱ्याला कधीही उत्तर देत नाही”; नारायण राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

Aditya Thackeray | दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा फोन करून “आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये” अशी विनंती केल्याचा धक्कादायक दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी देखील नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“माझं तेच काम आहे, यांना उत्तर द्यायचं नाही, कारण यांना पगारच इतरांवर घाण आरोप करायचा मिळतो. आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल माझ्या वडिलांवर असेल, माझ्या पक्षावर असेल, त्यांनी आरोप केले. त्यांना पक्ष सोडून किती वर्ष झाली मात्र त्यांच्या मनातून आम्ही काय उतरत नाही. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात. पण मी या कचऱ्याला कधीही उत्तर देत नाही. बोलू द्या त्यांना राहू द्या,” असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “आज मी मुखमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मुंबईतील सगळ्याच आमदारांची आहे. 15 जानेवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन मी ज्या घोटाळ्याला समोर आणलं होतं, त्याच्याची चर्चा आता सुरू आहे,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलं होतं?
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचा आपल्याला दोनदा फोन आल्याचा त्यांनी दावा केला आहे. सतीश सालियन यांच्यावर दबाव होता. घरी पेडणेकर ताई जायच्या. आणि इतर लोक जायचे. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. ते दु;खात होते. त्यावेळी त्यांना पोलीस मदत करत नव्हते. आरोग्य विभाग मदत करत नव्हता असा आरोपही यावेळी राणे यांनी केला. Aditya Thackeray |
नारायण राणे म्हणाले, “दिशा सालियन प्रकरण घडल्यानंतर मला पहिला फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी सांगितलं की उद्धव ठाकरे बोलणार आहेत. त्यांनी मला विनंती केली की, सध्या आदित्यचं नाव घेऊ नका. मी त्यांना म्हणालो, एका निरपराध मुलीची हत्या झाली आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या, ते संध्याकाळी कुठे जातात हे बघा. त्यावर ते म्हणाले, मी काळजी घेतो, पण तुम्ही सहकार्य करा.” Aditya Thackeray |
राणे पुढे म्हणाले, “दुसरा फोन कॉल हा कोरोनाकाळात आला. त्यावेळी आमच्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे प्रलंबित होती. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ती मिळेल, पण पुन्हा एकदा आदित्यचं नाव घेऊ नये अशी विनंती केली. या प्रकरणात सहकार्य करा, असं ते म्हणाले.”
यासोबतच राणेंनी सालियन कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप केला. मुलगी गेल्यानंतर ते धक्क्यात होते. त्यांना पोलिसांनी, आरोग्य विभागाने सहकार्य केले नाही. माजी महापौर पेडणेकर यांनी जाऊन सालियन कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्यावर दबाव आणाल्याचा त्यांनी आरोप केला.
हेही वाचा:
वाघोलीत फ्लॅटवर पोलिसांचा छापा: ४ पिस्तुले, ८ काडतुसांसह चार सराईत गुन्हेगारांना अटक!





