अरुण जेटलींच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक ट्विट
नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
PM Modi: With the demise of Arun Jaitley Ji,I have lost a valued friend,whom I have had the honour of knowing for decades. His insight on issues&nuanced understanding of matters had very few parallels. He lived well,leaving us all with innumerable happy memories.We will miss him! https://t.co/cNnb0CbXsv
— ANI (@ANI) August 24, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण अत्यंत जवळचा मित्र आज गमावला असल्याचे भावनिक ट्विट केले आहे. तसेच या अशा मित्राला अनेक वर्ष मला जाणून घेता आल्याचे भाग्य लाभले. त्यांची एखाद्या मुद्याला समजून घेण्याची दृष्टी ही अत्यंत दुर्लभ होती असे सांगत त्यांच्यासोबत आमच्या असंख्य आठवणी आहेत. तुम्ही आमच्या कायम स्मरणात रहाल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.