पांढरा पोशाख, लांब केस आणि कपाळावर टिळा…; ‘छावा’नंतर अक्षय खन्ना ‘असुरगुरू शुक्राचार्यां’च्या भूमिकेत

Akshaye Khanna | ‘छावा’ सिनेमात साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेनंतर आता अभिनेता अक्षय खन्ना एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘हनुमान’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘महाकाली’ चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच चित्रपटातील अक्षय खन्नाचा पहिला लूक शेअर केला आहे.
अक्षय खन्नानं चित्रपटात असुरगुरू शुक्राचार्यांची भूमिका साकारली आहे. पांढऱ्या पोशाखात लांब पांढरे केस आणि कपाळावर टिळा लावल्याचं दिसतंय. अक्षय खन्नाचा लूक थक्क करणारा आहे. या लुकमध्ये अक्षय खन्नाला ओळखणे देखील कठीण आहे.
In the shadows of gods,
rose the brightest flame of rebellion 🔥Presenting The Enigmatic #AkshayeKhanna as the eternal ‘Asuraguru SHUKRACHARYA’ from #Mahakali 🔱❤️🔥@PujaKolluru @RKDStudios #RKDuggal #RiwazRameshDuggal @ThePVCU pic.twitter.com/mclj39Q8z9
— Prasanth Varma (@PrasanthVarma) September 30, 2025
प्रशांत वर्मा यांनी ‘महाकाली’तील असुरगुरू शुक्राचार्य यांच्या भूमिकेतला अक्षय खन्नाचा लूक रिलीज करत, “देवांच्या सावलीत, महाकालीतून शाश्वत ‘असुरगुरु शुक्राचार्य’च्या रूपात बंडाची सर्वात तीव्र ज्वाला उठली”, असे कॅप्शन दिले आहे. सध्या ‘महाकाली’ चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Akshaye Khanna |
दरम्यान, ‘हनुमान’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा त्यांच्या नवीन ‘महाकाली’ चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या आगामी चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल किंवा चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अक्षय खन्नाचा यातील लुक पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. Akshaye Khanna |
हेही वाचा:





