कपिल शर्माच्या ‘किस किस से प्यार करु’ चित्रपटाचा येणार सीक्वल; शुटींगला सुरुवात

Kapil Sharma Film | कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या विनोदी शैलीमुळे लोकप्रिय आहे. कॉमेडियन शोसह त्याने चित्रपटात देखील उत्तम अभिनय केला आहे. ‘किस किस से प्यार करु’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने सिने इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. यानंतर कपिल ‘किस किस से प्यार करु’ च्या सीक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शुटींग मुंबईत सुरू झाल्याची माहिती देखील त्याने दिली आहे.
अब्बास मस्तान यांनी ‘किस किस किस किस किस किस कर करू’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर ‘किस को प्यार करु’च्या सीक्वलच्या दिग्दर्शन अनुपम गोस्वामी करणार आहेत. याशिवाय रजत जैन, गणेश जैन आणि अब्बास मस्तान यांची निर्मीती आहे.
पहिल्या भागात कपिल शर्मासोबत अभिनेत्री सई लोकूर, जेमी लीव्हर, अरबाज खान, मंजिरी फडणीस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम, वरुण शर्मा, सुप्रिया पाठक, शरत सक्सेना आणि मनोज जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील कपिलच्या पात्राचे नाव कुमार शिव राम किशन आहे. Kapil Sharma Film |
View this post on Instagram
कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. दरम्यान, कपिलने ‘किस किस को प्यार करु’च्या सीक्वेलच्या शूटिंगचफोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘प्रेक्षकांच्या आग्रहास्तव, किस किस को प्यार करु 2,’ असे लिहिले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Kapil Sharma Film |
हेही वाचा:





