“तोकडे कपडे घालणाऱ्या महिला आवडत नाही, सेल्फी काढण्यास….”; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Kailash Vijayvargiya | भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमधील एका कार्यक्रमात महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. महिलांनी तोकडे कपडे घालू नयेत, त्या चांगल्या दिसत नाहीत मी अशा महिलांसोबत फोटो सुद्धा काढत नाही. असं त्यांनी म्हटलं आहे. कैलाश विजयवर्गीय यांच्या भाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘जर भारतात एखादी मुलगी चांगले आणि सुंदर कपडे घालते, चांगला मेकअप करते आणि चांगले दागिने घालते तेव्हा लोक तिला खूप सुंदर समजतात. पण परदेशात जर एखादी स्त्री कमी कपडे घालत असेल तर ती चांगली आहे, असे मानले जाते. आता हीच परकीयांची विचारसरणी आहे, असेही विजयवर्गीय म्हणाले.
नेमकं काय म्हणाले विजयवर्गीय?
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय इंदूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, “आपल्याकडे काय चांगलं आहे तर मुलींनी चांगला सांजश्रृंगार करावा. त्यांनी चांगले दागिने घालावेत. चांगले कपडे घालावेत. अशा मुलीला आपण सुंदर म्हणतो. परदेशात जी कमी कपडे घालते, तिला सुंदर म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, कमी कपडे घालणारी मुलगी जशी सुंदर असते, तसंच कमी भाषण करणारा नेताही चांगला असतो. अशी म्हण परदेशात आहे. आपल्याकडे मी याचं पालन करत नाही”, असे विजयवर्गीय म्हणाले.
“सेल्फी काढण्यासही देतो नकार” Kailash Vijayvargiya |
मंत्री कैलाश विजयवर्गीय पुढे बोलताना म्हणाले की, “माझं मत असं आहे की, “आपल्या इथे महिलांना देवीचे रूप मानतात. चांगले कपडे परिधान करावेत. मला तर कमी कपडे घालणाऱ्या मुली आवडत नाहीत. कधी कधी मुली जेव्हा माझ्यासोबत सेल्फी काढायला येतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की, बेटा, पुढच्या वेळी व्यवस्थित कपडे घालून ये, मग आपण फोटो काढू,” असे म्हणत त्यांनी कपड्यांमुळे सेल्फी काढण्यास नकार देत असल्याचेही सांगितले.
दरम्यान, विजयवर्गीय यांच्या विधानानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “या नेत्यांची विचारसरणी समजत नाही, यांची भाषणे बहुतेकदा महिला, त्यांचे कपडे यांच्याविषयीच असतात. त्यांनी महिलांच्या मुद्द्यांवर संवेदनशीलता राखली पाहिजे,” तृणमूल काँग्रेसने म्हंटले आहे. Kailash Vijayvargiya |
हेही वाचा:
एकनाथ शिंदे विमानतळावर ताटकळले; पायलटचे विमान उडवण्यास नकार; नेमकं काय घडलं?





