“मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि….”; पंढरपूरच्या वारीबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमींनी मागितली माफी

Abu Azmi apologized : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझामी यांनी पंढरपूरच्या वारीबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त करण्यात आला. राजकी नेत्यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत निषेध व्यक्त केला.
अखेर अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असून, आपला हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे.
जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता, असे अबू आझामी यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत, सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझं वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर करण्यात आले आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाले आझमी?
मी एक निष्ठावंत समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा एक अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो.
हाल ही में सोलापुर में मेरे द्वारा की गई एक टिप्पणी को लेकर जो गलतफहमियाँ फैली हैं, मैं उन्हें स्पष्ट करना चाहता हूँ। मेरे वक्तव्य को तोड़–मरोड़ कर और दुर्भावनापूर्ण ढंग से प्रस्तुत किया गया। यदि इससे वारकरी सम्प्रदाय की धार्मिक भावना आहत हुई हो, तो मैं अपने शब्द पूरी तरह से वापस…
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) June 23, 2025
मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. ती कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधण्याचा होता की त्यांच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत.
आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेशी कधीही तडजोड होऊ देणार नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
वादग्रस्त विधान काय होते?
आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही, मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते.
हेही वाचा : Pune : एअर इंडियाकडून पुण्यातील ५ उड्डाणे रद्द





