Manoj Jarange : “मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर….”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Manoj Jarange : माढा येथे आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य करत वरील वक्तव्य केले.

Manoj Jarange : सध्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. यानंतर आता एक मोठं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे.
“मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका.” असे वक्तव्य करून मनोज जरांगेंनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात कुणबी समाजाची ४ प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर जरांगे कमालीचे आक्रमक झाले आहेत. माढा येथे आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य करत वरील वक्तव्य केले.
“एक वर्षभर मी फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात तर त्यांनी असला कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही.” अशा शब्दांत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
खरंतर जरांगे यांनी सरकारमधील मंत्र्यांची नावं घेत त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. माढ्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका ठिकाणी आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना कितीही वळवळ करू द्या, यांचा माज मोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही.” अशा शब्दांत टीकेची धार आणखी तीव्र केली.
गंभीर आरोप
“देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना ५८ लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी या नोंदी रद्द करण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरत एक प्रकारे खुले आव्हान दिल्याची चर्चा होत आहे.
पुन्हा एकदा एल्गार
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर २९ अॅागस्टपासून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. हे निर्णायक आंदोलन असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. २८ अॅागस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला असून, दुसऱ्या दिवशी आंदोलनाला बसणार असल्याचे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकराकडून काय पाऊल उचलली जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Iran Supreme Leader : दुखापतीच्या चर्चांनंतर मोजतबाचा नवा VIDEO समोर ; प्रकृती कशी आहे?, वाचा






