Diljit Dosanjh : मी माझ्या क्षेत्रात खूप आनंदी आहे धन्यवाद.! राजकारणात प्रवेशाच्या चर्चांवर दिलजीतचे स्पष्टीकरण
दिलजीत दोसांझ हा नेहमीच पंजाबच्या प्रश्नांवर उघडपणे बोलण्यासाठी ओळखला जातो. २०२० मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाला त्याने जाहीर पाठिंबा दिला होता.

Diljit Dosanjh – जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारा पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ याने राजकारणात प्रवेश करण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी लोकांचे मनोरंजन करण्यातच खूप आनंदी आहे, असे म्हणत त्याने राजकीय इनिंग सुरू करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलजीतने एका लेखाचा संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केली. या लेखात जागो पंजाब मंच या नागरी गटाने दिलजीतला राजकारणात येण्याचे जाहीर आवाहन केले होते.

Diljit Dosanjh : मी माझ्या क्षेत्रात खूप आनंदी आहे धन्यवाद.! राजकारणात प्रवेशाच्या चर्चांवर दिलजीतचे स्पष्टीकरण
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या आणि आर्थिक संकटात असलेल्या पंजाबला दिलजीतसारख्या नेत्याची गरज असल्याचे या गटाने म्हटले होते. यावर उत्तर देताना दिलजीतने माझे काम मनोरंजन करणे आहे. मी माझ्या क्षेत्रात खूप आनंदी आहे असे म्हणत धन्यवाद दिले आहेत. (Diljit Dosanjh )
दिलजीत दोसांझ हा नेहमीच पंजाबच्या प्रश्नांवर उघडपणे बोलण्यासाठी ओळखला जातो. २०२० मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाला त्याने जाहीर पाठिंबा दिला होता.
मात्र, अलीकडेच कॅनडातील एका कार्यक्रमादरम्यान खलिस्तानी झेंडे फडकवणाऱ्यांना त्याने स्टेजवरूनच खडे बोल सुनावले होते. ज्यांना झेंडे दाखवायचे आहेत त्यांनी दाखवत राहावे, पण हा उपद्रव इथे बंद करा, असे त्याने ठणकावून सांगितले होते.
दिलजीत सध्या त्याच्या अभिनय कारकीर्दीच्या शिखरावर आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉर्डर २ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर, आता तो इम्तियाज अली दिग्दर्शित मैं वापस आऊंगा या चित्रपटात दिसणार आहे. (Diljit Dosanjh )
या चित्रपटात त्याच्यासोबत वेदांग रैना, शर्वरी वाघ आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका असून, हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांमधील संभ्रम दूर झाला असून, तो केवळ कलेवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





