Jayant Patil : मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही; जयंत पाटलांचा पडळकरांवर शाब्दिक प्रहार

Jayant Patil : गेल्या काही दिवसांपूर्वी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, असं म्हणत ज्या मतदार संघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी करत या वक्तव्यातून त्यांनी पडळकरांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
पडळकर काय म्हणाले होते?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहेत. ते म्हणतात तसे सांगली जिल्हा, वाळवा तालुका कधी झुकत नाही, हे बरोबर आहे, पण जयंत पाटील झुकत नाही, थेट पालथाच पडतोय अशी जहरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती.
जयंत पाटीलांचे टीकेला जोरदार प्रत्युत्तर
मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी करत एकप्रकारे पडकळकरांचे नाव न घेता त्यांना थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
…त्या वक्तव्यावरून टीका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात काही बदल करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पक्षातील प्रदेशाध्यक्ष पद शशिकांत शिंदे यांना देण्यात आलं. तर काही महत्वाच्या पदांवर नवीन नियक्ताही जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याची चर्चा रंगली होती.
तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वाळवा तालुका सहजा सहजी झुकत नाही, असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलं होतं. यामुळे चर्चांना उधान आलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती.
हेही वाचा : Pune Crime | पीएमपी वाहक महिलेचा विनयभंग ; आरोपीवर गुन्हा दाखल





