मी दत्ता नाही.! पोलीसही चक्रावले, गावात अधिकाऱ्यांना लागला चकवा; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर घटना

Dattatreya Gade arrested : पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाव गावातील एका शेतातील विहिरीजवळून त्याला अटक करण्यात आली. आरोपाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.
त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी तांत्रिक वस्तूंचा म्हणजेच ड्रोन आणि डॅाग स्कॅाडचा वापर करून आरोपाचा शोध लावला आहे. त्याच्या शोधासाठी गावातील स्थानिकांनी पोलिसांना मदत केली असल्याची मााहिती मिळत आहे. आरोपी लपून बसलेला होता. पण पोलिसांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आरोपीला शोधून काढलं आहे.
पोलिसांनी ज्याठिकाणी शोध मेहिम सुरु केली होती, त्या ठिकाणी आरोपी नव्हता. पण जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी केली तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर दत्तात्रय शेतात सापडला. पण त्याआधी पोलिसांनी दुसऱ्याच गाडेला ताब्यात घेतलं होत. जो हुबेहूब आरोपी दत्तात्रय गाडे सारखा दिसत होता.
पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता. पोलिसांनी आरोपीसारख्या दिसणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांना वाटलं की त्यांना दत्ता सापडला आहे. म्हणून पोलिसांनी मोकळा श्वास देखील घेतला. पण नंतर असं काही झालं, ज्यावर पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही.
15 ते 20 मिनिटांनंतर पोलिसांना कळलं की, हा आरोपी नसून त्याचा भाऊ आहे. जो हुबेहूब आरोपीसारखा दिसतो. जेव्हा पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा आरोपीचा भाऊ घरात होता. दत्तात्रय याच्या भावाला पाहून पोलीस देखील हैराण झाले.
तेव्हा आरोपीचा भाऊ पोलिसांना म्हणाला, ‘मी दत्ता नाही त्याचा भाऊ आहे. दत्ता माझ्यासारखा दिसतो. तुम्ही दत्ताला शोधत आहात का?’ असा प्रश्न दत्तत्रय याच्या भावाने पोलिसांना विचारला… त्यानंतर दत्तात्रय याच्या भावाची पोलिसांनी सुटका केली आणि खऱ्या आरोपीला अटक केली.
कशी झाली दत्ता गाडेला अटक?
आरोपी दत्ता गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, 100 पोलीस, ड्रोन, श्वान पथकं गावात दाखल झाले होते. 25 एकर शेतात पहाणी करुनही आरोपी न सापडल्याने तेथील शोधमोहीम काही वेळ थांबवण्यात आली.
यादरम्यान, जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्ता गाडे कासावीस झाला होता. त्यानंतर त्याने त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन पाणी मागितले. त्यानंतर त्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.





