R. Madhavan : ‘मी कट्टर शाकाहारी, पण…’; आर. माधवन याने शेअर केला कॅनडातील धक्कादायक अनुभव म्हणाला…
R. Madhavan : २०२३ मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या एका मुलाखतीत माधवनने आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला.

R. Madhavan : ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता आर. माधवन घराघरात पोहोचला. या चित्रपटातील त्याने साकारलेलं ‘मॅडी’ हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतरही माधवनने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे अनुभव आले आहेत. (R. Madhavan)
२०२३ मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या एका मुलाखतीत माधवनने आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. एका विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला कॅनडाला जाण्याची संधी मिळाली होती. ( R. Madhavan)
माधवनने सांगितलं की, तो कॅनडातील स्टेटलर नावाच्या ठिकाणी गेला होता. हा परिसर ‘वाइल्ड वेस्ट’ संस्कृतीसाठी ओळखला जात होता. या काळात तो एका काउबॉय कुटुंबासोबत राहत होता.
या अनुभवाबद्दल बोलताना माधवनने सांगितलं की, तो कट्टर शाकाहारी आहे. मात्र, ज्या कुटुंबासोबत तो राहत होता, त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गुरांशी संबंधित कामातून होत होता. या परिस्थितीचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. आपल्या या अनुभवाला त्याने आयुष्यातील “सर्वात मोठं पाप” असंही संबोधलं.
लॉकर रूममध्ये जाण्याचीच वाटायची भीती (R. Madhavan)
याच मुलाखतीत माधवनने कॅनडातील आणखी एक अनुभव सांगितला. त्या काळात तो बास्केटबॉल संघाचा भाग होता. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंना लॉकर रूममध्ये जाऊन एकत्र आंघोळ करावी लागत असे.
मात्र, माधवनसाठी हा अनुभव काहीसा अवघड होता. प्रत्यक्ष बास्केटबॉल खेळण्यापेक्षा लॉकर रूममध्ये जाण्याचीच त्याला अधिक भीती वाटत होती. सुरुवातीला त्याला नेमकं काय करावं हेच समजत नव्हतं. त्यामुळे त्याने अंतर्वस्त्र न काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अंतर्वस्त्र घालून लॉकर रूममध्ये गेल्यानंतर इतर मुलं त्याच्याकडे पाहू लागली. हे पाहून माधवनला काहीसं विचित्र वाटलं.
काही काळ त्याने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा पद्धतीने राहणं आपल्याला सोयीचं वाटत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे त्याने स्वतःच्या सोयीप्रमाणे परिस्थिती हाताळण्याचा मार्ग निवडला.
आर. माधवनच्या या जुन्या आठवणीचा किस्सा पुन्हा चर्चेत आला असून, अभिनेता होण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात आलेले हे अनुभव किती वेगळे आणि आव्हानात्मक होते, याची झलक या आठवणीतून पाहायला मिळते.
Hartalika Makeup: हरितालिकेला दिसायचंय खास? ट्राय करा हे ‘6’ सुंदर मेकअप आणि हेअरस्टाइल लूक!






