Canada News : कॅनडात भारतीय महिलेच्या हत्या प्रकरणी एकाला अटक
हत्या झालेल्या हिमांशी खुराना या ३० वर्षीय भारतीय महिलेचा तो भागीदार होता आणि त्याला टोरांटो विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

Canada – कॅनडामद्ये बारतीय महिलेच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. अब्दुल घाफूरी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गेल्या सात महिन्यांपासून फरार होता. हत्या झालेल्या हिमांशी खुराना या ३० वर्षीय भारतीय महिलेचा तो भागीदार होता आणि त्याला टोरांटो विमानतळावर अटक करण्यात आली असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
हिमांशी खुराना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टोरोंटो येथील एका निवासस्थानात मृतावस्थेत आढळली होती. तिचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचे पोलिसांनी निश्चित केले होते आणि ती गफूरीसोबत घनिष्ठ नातेसंबंधात होती असे म्हटले होते.
मात्र, हत्येचा नेमका तपशील प्रसारमाध्यमांना देण्यात आला नव्हता. तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिछी ओळख पटली आणि नंतर गफूरीच्या नावे अटक वॉरंट काढण्यात आले. पण त्याला शोधून परत आणण्यासाठी सात महिने लागले.
गफूरी देशाबाहेर निघून गेल्याने त्याला परत आणण्यासाठी फ्युजिटीव्ह क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी मिसिंग पर्सन्स .युनिटने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपास संस्थांबरोबर समन्वयाने प्रयत्न केले होते. गफूरी कोणत्या देशात पळून गेला होता, हे उघड केले गेले नाही.





