Paris Olympics 2024 (Laura and Jason Kenny) : ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला क्रीडा महाकुंभातील सर्वात यशस्वी जोडप्यांबद्दल सांगणार आहोत. या जोडप्याने एकूण 15 पदके जिंकली आहेत.
पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या क्रीडा महाकुंभात जगातील विविध देशांतील खेळाडू सहभागी होणार आहेत.
दरम्यान, आम्ही तुम्हाला ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी जोडप्याबद्दल सांगणार आहोत. जेसन केनी हा इंग्लंडचा माजी ट्रॅक सायकलस्वार आहे. केनी वैयक्तिक आणि सांघिक स्प्रिंटमधील स्पेशालिस्ट आहे. केनीने ऑलिम्पिकमध्ये एकूण 9 पदके जिंकली, ज्यात 7 सुवर्णंपदकांचा समावेश आहे.
जेसन केनीची पत्नी लॉरा केनी (Laura Kenny & Jason Kenny) देखील माजी ब्रिटिश सायकलस्वार आहे. लॉराने एकूण 6 पदके जिंकली असून त्यात 5 सुवर्णंपदकाचा समावेश आहे.
लॉराने त्यांची भेट चांगली झाली नसल्याचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, ते दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हा जेसन भेटीदरम्यामन त्याच्या कॉफीकडे जास्त लक्ष देत होता.
मात्र, हळूहळू दोघेही जवळ आले. त्यानंतर 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये दोघेही किस करताना दिसले होते. या ऑलिम्पिकमध्ये एका व्हॉलीबॉल सामन्यादरम्यान दोघांचे किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
त्यानंतर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकनंतर जेसन आणि लॉराने (Laura Kenny & Jason Kenny) लग्न केले. अशा प्रकारे दोघेही ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी जोडपे ठरले.