एल्सा वादळ क्युबाच्या दिशेने; वादळात 3 ठार
Updated On:

पोर्ट ऑ प्रिन्स (हैती) – एल्सा चक्रिवादळ हैतीच्या दक्षिणेकडील किनारपट्टीला आणि डॉमनिकाला थडकले असून आतापर्यंत या वादळाच्या तडाख्यात तिघाजणांचा मृत्यू झाला आहे.
वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. हे वादळ ताशी 175 मैल वेगाने जमेकाच्या मॉन्टेगो खाडीच्या दिशेने सरकत आहे. सध्या या वादळाची तीव्रता श्रेणी-1 मध्ये गणली जात असून क्युबाजवळ पोहोचेपर्यंत त्याची तीव्रता थोडी क्षीण झाली असेल. असे मियामीमधील नॅशनल हरिकेन सेंटरने म्हटले आहे.
हे वादळ आता प्रथम क्युबाला आणि नंतर फ्लोरिडाला धडकण्याची शक्ता आहे. त्यानंतर आखाती प्रदेशात किंवा अटलांटिक किनारजट्टीजवळ ते शांत होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रदेशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





