Iran vs US-Israel War : अमेरिकेबरोबरचे मतभेद संपवण्यासाठी क्युबाचे प्रयत्न; वाटाघाटींना झाली सुरुवात
अमेरिकेबरोबरचे मतभेद संपवण्यासाठी क्युबाने प्रयत्न सुरू केले आहेत. क्युबाचे अध्यक्ष मिग्युएल दियाझ-कॅनेल यांनी ही माहिती दिली.

हवाना (क्युबा) – अमेरिकेबरोबरचे मतभेद संपवण्यासाठी क्युबाने प्रयत्न सुरू केले आहेत. क्युबाचे अध्यक्ष मिग्युएल दियाझ-कॅनेल यांनी ही माहिती दिली. क्युबा आणि अमेरिकेमध्ये समझोता केला जाईल, असा अंदाज व्यक्त होत होता. त्या वाटाघाटींना सुरुवात झाली असल्याचे अध्यक्ष कॅनेल यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
अमेरिका आणि क्युबामधील तणावावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने ही चर्चा झाली. या वाटाघाटींना आंतरराष्ट्रीय घटकांनी मदतच केली, असेही दियाझ- कॅनेल म्हणाले. पण त्यांनी घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली नाही किंवा चर्चेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. व्हाइट हाउसकडूनही या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले नाही.
अमेरिकेने केलेल्या सागरी नाकाबंदीमुळे क्युबामध्ये गेल्या ३ महिन्यांपासू तेल आयात करणारे कोणतेही मालवाहू जहाज येऊ शकलेले नाही. क्युबा नैसर्गिक वायू, सौर उर्जा आणि थर्मोइलेक्ट्रीक प्रकल्पांवरच अवलंबून आहे.
इंधन तेल आणि डिझेलच्या कमतरतेमुळे दोन वीज प्रकल्प बंद करावे लागले आहेत आणि सौर प्रकल्पांमधील वीज निर्मिती मर्यादित झाली आहे. गेल्या आठवड्यात क्युबाच्या पश्चिम भागात मोठा वीजपुरवठा खंडित झाला होता.
त्यामुळे लाखो लोकांसाठीचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. क्युबा आपल्या पेट्रोलियम उत्पादनांपैकी ४० टक्क्यांइतरी वीज स्वतःच करत आहे, परंतु मागणी पूर्ण करण्यासाठी ती पुरेशी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण घरे आणि सामाजिक केंद्रांमध्ये ९५५ सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत आणि मार्च अखेरीस आणखी सौर यंत्रणा ऑनलाइन होतील. त्यामुळे क्युबाच्या वीज निर्मितीमध्ये १०० मेगावॅटची भर पडेल, असे दियाझ-कॅनेल म्हणाले.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर व्हेनेझुएलातून क्युबाला होणारी तेल वाहतूक थांबवण्यात आली.





