us-cuba news : तेलपुरवठा थांबवला..! क्यूबावर अमेरिकेकडून नवीन निर्बंध; आणखी विपरीत परिणाम होणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने क्यूबावर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

us-cuba news – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने क्यूबावर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.
क्यूबाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या ग्रुप डी ऍडमिनिस्ट्रेसिएल एप्रेसेरियल एस.ए. अर्थात गाएसा या कंपनीवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. गाएसा व्यतिरिक्त कॅनडाच्या शेरिएट इंटरनॅशनलबरोबर क्यूबाचा संयुक्त उपक्रम असलेल्या मोआ निकेलवरही निर्बंध घातले गेले.
निर्बंधांची घोषणा झाल्यानंतर कॅनडाच्या कंपनीने तात्काळ उद्योगातून माघार घेण्याची घोषणा केली. ही कंपनी ३२ वर्षांपासून क्यूबामध्ये कार्यरत होती.
या नवीन निर्बंधांमुळे अमेरिका क्यूबाशी संबंधित तिसऱ्या देशावर, तेथील कंपन्यांवर अधिक जाचक निर्बंध घालू शकणार आहे. अमेरिकेने जानेवारीपासून क्यूबाला होणारा तेलपुरवठा थांबवला आहे.
त्यामुळे आगोदरच अडचणीत आलेल्या क्यूबाच्या अर्थकारणावर या नवीन निर्बंधांमुळे आणखी विपरीत परिणाम होऊ शकणार आहेत, अस अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
निर्बंधांमुळे गाएसाचेअन्य भागीदार संस्था, आतंरराष्ट्रीय वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या आणि प्राधिकरणे देखील क्यूबापासून लांब जातील, असा धोका आहे.





