हुमाचा ‘पब्लिकली किस’साठी होकार’

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध स्टार गॅरी मेहिगन सध्या भारतात आहे. गॅरी मेहिगनने अभिनेत्री हुमा कुरेशीची भेट घेतली. या भेटीत असे काही घडले की गॅरी मेहिगन आणि हुमा चर्चेत आले आहे. खरं तर, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गॅरी मेहिगन हुमाला किस करण्यापूर्वी तिची परवानगी घेताना दिसत आहे.
इंस्टाग्रामवर हुमा कुरेशी आणि गॅरी मेहिगनचा हा मनोरंजक व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की गॅरी मेहिगन हुमाला किस करण्यापूर्वी तिच्याकडून मंजुरी घेते. यावर हुमा म्हणाली,’हो नक्कीच.’ त्यानंतर दोघेही एकमेकांना किस करतात. हुमाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तिचे चाहते या व्हिडिओवर कंमनेट्सचा वर्षावर करत आहे. गॅरी मेहिगन सध्या कोनोश कुकिंग मास्टरक्लाससाठी मुंबईत आहे.
विशेष म्हणजे प्रसिद्ध शेफला स्वतः भेटलेली हुमा कुरेशीही एका प्रसिद्ध शेफच्या भूमिकेत दिसणार आहे. हुमा कुरेशी ‘तरला’ चित्रपटात प्रसिद्ध शेफ तरला दलालच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.





