मुंबईत शॉपिंग मॉलला भीषण आग
Updated On:

मुंबई – मुंबईच्या मालाड पश्चिमेकडे एका शॉपिंग मॉलला आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील जैन मंदिर रोडवरील ऍकमे शॉपिंग सेंटरला लागली.
ऍकमे शॉपिंग मॉल मधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्राला ही आग लागली असल्याचे समजते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शॉपिंग मॉलला लागलेली आग ही लेव्हल 1 ची आहे.
घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांसोबात मालाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी देखील पोहोचले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे.





