3 हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, 108MP AI कॅमेऱ्यासह मिळतात अनेक दमदार फीचर्स

Infinix Note 40x 5G Offer | स्मार्टफोनमध्ये एक चांगला कॅमेरा असणे गरजेचे आहे. तुम्ही देखील चांगल्या कॅमेऱ्यासह कमी किंमतीत येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर Infinix Note 40x 5G चा विचार करू शकता. 15 हजार रुपयांच्या बजेट येणाऱ्या येणाऱ्या या फोनमध्ये 108MP AI लेन्स, 16GB रॅमसह अनेक शानदार फीचर मिळतील. या फोनला तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या फोनच्या किंमत, फीचर्स आणि डिस्काउंटविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Infinix Note 40x 5G चे फीचर्स
Infinix Note 40x 5G मध्ये 6.78 इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1300nits आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर दिला असून, हँडसेट Android 14 वर काम करतो. यात 8GB रॅम आणि 8GB ची व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट मिळतो. ज्यामुळे फोनमध्ये एकूण 16GB रॅमचा फायदा मिळेल.
इनफिनिक्सच्या या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात फोटोग्राफीसाठी रियरला एआय लेन्ससह 108MP चा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
Infinix Note 40x 5G ची किंमत
Flipkart वर Infinix Note 40x 5G चे 8GB रॅम + 256GB स्टोरेजसह येणारे व्हेरिएंट 12,999 रुपयात उपलब्ध आहे. या फोनला कंपनीने 14,999 रुपये किंमतीत लाँच केले होते. तुम्ही हा फोन खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 1000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. अशाप्रकारे, फोनला 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त 11,999 रुपयात खरेदी करता येईल.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून फोन खरेदी केल्यास 5% कॅशबॅकही मिळेल. फोनवर 9 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. याशिवाय, फोनला नो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल.





