illegal gratification case : …तरीही भाजपच्या आमदाराला अद्याप अटक का झाली नाही?; केजरीवालांचा मोदींना सवाल

नवी दिल्ली – आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावरील छाप्यातून काहीच हाती लागले नाही. तरीही त्यांना अटक करण्यात आली. कर्नाटकमधील भाजपच्या एका आमदाराकडे प्रचंड रोकड सापडली. तरीही त्याला अटक का झाली नाही, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ट्विट करत केजरीवाल यांनी विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला. आता मोदींनी कधीही भ्रष्टाचाराविरोधात लढण्याविषयी बोलू नये. तशी भाषा त्यांच्या तोंडी शोभणारी नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले.
प्रधान मंत्री जी,
मनीष सिसोदिया के घर से रेड में कुछ नहीं मिला। उन पर CBI, ED की सारी धारायें लगाकर गिरफ़्तार कर लिया। आपकी पार्टी के MLA के यहाँ इतना कैश मिला, उसकी गिरफ़्तारी नहीं?
अब आप कभी भी भ्रष्टाचार से लड़ने की बात तो मत ही करना। आपके मुँह से अच्छा नहीं लगता। https://t.co/dZtU5krIXl
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 7, 2023
त्यांनी डिजिटल पत्रकार परिषदेतही मोदींवर निशाणा साधला. दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांकडे 65 वर्षे दुर्लक्ष करण्यात आले. त्या क्षेत्रांत सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी चांगले कार्य केले. मात्र, देशासाठी चांगले कार्य करणाऱ्यांना मोदी तुरूंगात टाकत आहेत. त्याउलट, देश लुटणाऱ्यांना आलिंगन दिले जात आहे, असे ते म्हणाले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/karnataka-hc-grants-anticipatory-bail-to-bjp-mla-madal-virupakshappa-in-illegal-gratification-case/
सिसोदिया आणि जैन तुरूंगात असल्याची मला बिल्कूल चिंता वाटत नाही. देशासाठी प्रसंगी प्राणांचेही बलिदान देण्याची तयारी असणारे ते धैर्यवान लोक आहेत. देशात सध्या असलेल्या स्थितीची चिंता मला वाटते, अशी भूमिकाही केजरीवाल यांनी मांडली.





