HSC Exam: पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला सापडले 17 कॉपीबहाद्दर
Updated On:

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये कॉपी करताना १७ विद्यार्थी सापडले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र काही ना काही प्रमाणात कॉपीची प्रकरणे आढळून येऊ लागली आहेत. पुणे विभागात सर्वाधिक ७ कॉपीची प्रकरणे आढळून आली आहे. नागपूर मध्ये ३, औरंगाबाद मध्ये ३, अमरावतीत १, नाशिक मध्ये २, लातूरमध्ये १ याप्रमाणे कॉपी सारख्या गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत.
दरम्यान मुंबई, कोल्हापूर, कोकण या विभागात एकही कॉपीचे प्रकरण आढळून आलेले नाही.
टॅग्स:





